Jalna Lok Sabha Political News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभेच्या जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देईल, अशी ग्वाही कल्याण काळे यांनी दिली. जालना येथे माजी खासदार राजु शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काळे यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने Swabhimani Shetkari Sanghtana मला जाहीर पाठिंबा दिला, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. शेतकरी संघटनेने कायम शेतकऱ्याचा बाजूने भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या पिकाला चार पैसे कसे शिल्लक मिळतील याबाबत शेतकरी संघटना कायम भांडत असते, मग सरकार कोणाचेही असो. त्यांच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो की त्यांनी महाविकास आघाडी व माझ्यावर विश्वास ठेवत मला जाहीर पाठिंबा दिला. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवेल, असा विश्वास काळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
जालना Jalna लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डाॅ.कल्याण काळे विरुद्ध महायुतीचे रावसाहेब दानवे यांच्यात थेट लढत होत आहे. दानवे भाजपकडून सहाव्यांदा मैदानात आहेत. तर काळे यांनी 2009 मध्ये दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवलेली आहे. यावेळी त्यांना आठ हजार इतक्या मतांनी निसटता पराभव झाला होता.
काँग्रेसने पुन्हा एकदा काळे Kalyan Kale यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिली. उद्या, काळे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जालन्यात सभा होणार आहे. त्यातच स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काळे यांना पाठिंबा जाहीर केला. राज्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणाशी आघाडी किंवा युती केलेली नाही. मात्र जालना लोकसभेत स्थानिक पातळीवर स्वाभिमानीने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान शेतकरी हितासाठीच आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब थोरात, शिवाजीराव भोसले, सुरेश गवळी, कृष्णा साबळे, मयूर बोर्डे, मुक्ताराम गव्हाणे, ज्ञानेश्वर मुळे, साईनाथ चिन्नादोरे, चंद्रकांत देशमुख, काकासाहेब साबळे पाटील, प्रकाश बोरसे, सुनील शिंदे, दिनकर पवार, प्रकाश वाघ यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.