Ajit Pawar: अजित पवारांनी महापालिका आयुक्तांना ठणकावलं; म्हणाले,'बारामतीचा 'तो' फॉर्म्युला पिंपरी चिंचवडमध्येही राबवा...'

Ajit Pawar strict action On flex: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता सन्मान सोहळा आणि स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या पूर्वतयारी कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी स्वच्छता आणि अनधिकृत फ्लेक्सबाजीवर भाष्य करताना आपल्या खास शैलीत टोमणे मारले.
 Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात फ्लेक्सबाजी करणाऱ्या नेत्यांना टोला लगावत, “ज्यांचे फ्लेक्स जास्त दिसतील, त्यांचे बटण निवडणुकीत दाबू नका” असा सल्ला नागरिकांना दिला.

  2. त्यांनी स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करून परदेशात नियम पाळले जातात, मग आपल्या देशात का नाही? असा सवाल केला व अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले.

  3. प्लास्टिक बंदीचा मुद्दाही त्यांनी मांडत, संपूर्ण राज्यात प्लास्टिकवर बंदी लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात फ्लेक्सबाजीवरून राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना खरमरीत टोला लगावला. “ज्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे शहरात जास्त फ्लेक्स लागलेले दिसतील, त्यांचे बटण निवडणुकीत दाबू नका,” असा थेट सल्ला अजित पवारांनी (Ajit Pawar) पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना दिला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात कोणाला उद्देशून हा टोला आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता सन्मान सोहळा आणि स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 च्या पूर्वतयारी कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी स्वच्छता आणि अनधिकृत फ्लेक्सबाजीवर भाष्य करताना आपल्या खास शैलीत टोमणे मारले. अजित पवार म्हणाले, “मी बीडचा (Beed) पालकमंत्री आहे. तिथले लोक म्हणतात, तुम्ही अधूनमधून बीडला या, कारण तुमच्या दौऱ्यामुळे शहर स्वच्छ होते. शहर स्वच्छ झाले की समजायचे, अजित पवार येत आहेत!”

"एक वेळ स्वच्छतेवरून मी स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्यावर चिडलो होतो. ते मला स्वच्छते संदर्भात सांगायचे. पण, ते सिंगापूरमध्ये एक आणि मुंबई विमानतळावर वेगळं वागायचे. परदेशात आपण नियम पाळतो. मग आपल्या देशात का नाही? तिथं कचरा टाकला की, चक्की पिसावी लागते," असे अजित पवार यांनी म्हटले.

 Ajit Pawar
Vice presidential Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 46 जणांना धक्का; पुण्याचा पठ्ठ्याही सलग दुसऱ्यांदा तोंडावर आपटला

बारामतीत अनधिकृत फ्लेक्स लावू नका, असे आम्ही परिपत्रक काढलं आहे. ज्याने फ्लेक्स लावला आणि ज्याचे ते फ्लेक्सचे बांबू आहेत, त्या दोघांवर गुन्हा दाखल केला जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरात ही तसं धोरण राबवा," असे आवाहन अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केलं.

"मग तो फ्लेक्स देवेंद्र भाऊ यांच्या असो की अजित पवारांचा... काही जण स्वतःचा फोटो मोठा दिसावा म्हणून आमचे फ्लेक्स लावतात," असे म्हणत अजित पवार यांनी फ्लेक्स लावणाऱ्यांना फटकारले आहे.

 Ajit Pawar
Laxman Hake Video: वादग्रस्त विधानाच्या व्हायरल व्हिडिओनं खळबळ, हाके कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडले; म्हणाले,'माझा जीव...'

"जो जास्त काम करतो, त्याचे फ्लेक्स कमी असतात आणि जो कामच करत नाही. त्याचे फ्लेक्स जास्त असतात. त्याचे बटन निवडणुकीत दाबू नका," असे म्हणत अजित पवार यांनी फ्लेक्सबाजी करणाऱ्यांना मतदान करून नका असा सल्ला पिंपरी- चिंचवडकरांना दिला आहे.

याशिवाय, त्यांनी प्लास्टिक बंदीचा मुद्दाही उपस्थित केला. “प्लास्टिकमुळे आरोग्याला हानी पोहोचते. लोणावळा आणि माथेरानमध्ये प्लास्टिकवर बंदी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सांगतोय, संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू करा,” असे आवाहन त्यांनी केले. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, असेही ते म्हणाले.

 Ajit Pawar
Devendra Fadnavis On Water Issue : छत्रपती संभाजीनगर शहरात वाढीव पाणी आता डिसेंबरला! मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला..

प्र.१: अजित पवार यांनी फ्लेक्सबाजीबाबत काय वक्तव्य केले?
उ.१: ज्यांचे फ्लेक्स शहरात जास्त दिसतील, त्यांना मतदान करू नका असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला.

प्र.२: हे वक्तव्य कुठे केले गेले?
उ.२: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता सन्मान सोहळा आणि स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 कार्यक्रमात.

प्र.३: फ्लेक्सबाजीविरोधात अजित पवार यांनी कोणते धोरण सुचवले?
उ.३: फ्लेक्स लावणारा आणि फ्लेक्सचे बांबू लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे धोरण.

प्र.४: प्लास्टिकबाबत अजित पवार यांची भूमिका काय होती?
उ.४: त्यांनी संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com