Kasba By Election : फडणवीसांचा एक फोन अन् कुणाल - शैलेश टिळक भाजप कार्यालयात...

Kasba By Election : फडणवीसांचा एक फोन अन् टिळक कुटुंब भाजपच्या सक्रिय प्रचारात..
Kasba By Election Devendra Fadnavis
Kasba By Election Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kasba By Election : कसबा पोटनिवडणुकीच्या अवती-भोवती अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारांनी अर्ज दाखल झाल्यानंतर आता पुन्हा ही निवडणुक बिनविरोध होण्याकडे पुन्हा एकदा प्रयत्न होते सुरू झाले आहेत, अशा घडामोडी घडत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टिळक कुटुंबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

Kasba By Election Devendra Fadnavis
Kasba By-Election : कसब्यातील दोन्ही उमेदवार कोट्यधीश; रासनेंची १७ कोटीची तर धंगेकरांची...

देवेंद्र फडणवीस यांनी टिळक परिवाराला फोन केल्याची माहिती आहे. यामध्ये फडणवीसयांच्याकडून टिळक कुटुंबीयांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला. कुणाल टिळक आणि फडणवीस यांच्यात दिवसभरात दोन वेळा फोनवरून चर्चा झाली आहे. आपण पक्षाचे आहोत. निवडणुकीत सांभाळून घ्या, आणि पक्षाचा सक्रिय प्रचार करा, अशी विनंती फडणवीसांनी केल्यानंतर टिळक कुटुंबीय भाजप बैठकीत सक्रिय दिसले.

Kasba By Election Devendra Fadnavis
Kasba by-election : चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंचे टेन्शन वाढले!

दरम्यान, एकीकडे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असतानाच निवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे (BJP) अजूनही प्रयत्न सुरु आहेत. पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेसने उद्या तीनपर्यंत अर्ज मागे घेतल्यास आम्ही आम्ही रासने यांची उमेदवारी मागे घेऊन, शैलेश टिळक यांना उमेदवारी देवू, असे म्हंटले आहे. काँग्रेसची अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com