NCP MLA : हत्तीवरून 125 किलो पेढे वाटणं दादाच्या आमदाराला पडलं महागात, थेट दाखल झाला गुन्हा

Elephant Procession Controversy In Pune : विधानसभा निवडणूक निकालानंतर महिने उलटल्यानंतर देखील काही नवनिर्वाचित आमदारांचा उत्साह अद्याप कमी झाल्याचं दिसत नाही.
Shankar Mandekar
Shankar MandekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणूक निकालानंतर महिने उलटल्यानंतर देखील काही नवनिर्वाचित आमदारांचा उत्साह अद्याप कमी झाल्याचं दिसत नाही. दशकांत दशकांची काँग्रेसची भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातील सत्ता उलटवून लावल्यानंतर अजित पवारांचे शिलेदार असलेले नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर अद्यापही विजय जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. मात्र हा जल्लोष आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

मांडेकर हे आमदार झाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पिरंगुट मध्ये मांडेकरांची हत्तीवरून मिरवणूक काढली. आणि विजयाचा आनंद म्हणून हत्तीवरून 125 किलो पेढे देखील वाटण्यात आले. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाल्या नंतर वनविभाग ॲक्शन मोडमध्ये येत कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

हत्तीवरून मिरवणूक काढून पेढे वाटल्या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन म्हणून शंकर मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. हत्तीवर मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आदित्य परांजपे यांनी अधिक माहिती घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shankar Mandekar
Shiv Sena: थांबा! साहेब येताहेत, कुठेही जाऊ नका ; नाराजांना रोखण्यासाठी ठाकरे सेनेची धडपड

या प्रकरणी मिरवणुकीचे आयोजक राहूल बलकवडे यांच्यासह हत्ती ज्यांच्या मालकीचा आहे. त्या सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपासासाठी वन विभागाचे पथक हा हत्ती सध्या जीथे आहे त्या सांगली जिल्ह्यातील तासगावला जाणार आहे.

याबाबत सोशल मीडिया वरती केलेली मांडेकरांची पोस्ट वायरल

मिरवणुकी बाबत मांडेकर यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट केली आहे. यात मांडेकर म्हणाले, उरवडे - आंबेगाव - बोतरवाडी - मारणेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हत्तीवरून मिरवणूक काढत व्यक्त केले प्रेम. भोर - राजगड - मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे,आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी,चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे १२५ किलो पेढे वाटले. ह्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही.

Shankar Mandekar
Rupali Chakankar : आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था रडारवर,कारवाई करण्याचे रुपाली चाकणकरांचे आदेश

माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय - बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com