Ajit Pawar News : सून असल्या तरी तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही; दादांनी पुन्हा घेतला साहेबांच्या विधानाचा समाचार

Ajit Pawar At Indapur Meeting with Doctor's : डॉक्टरांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले प्रतिभाताई आणि कल्पनाताई या डॉक्टर गेवराई आणि बीडच्या आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarakrnama

Pune Lok Sabha News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे इंदापूरच्या दौऱ्यावरती आहेत. या इंदापूरच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी डॉक्टरांच्या मेळाव्याला संबोधित केलं. या वेळी त्यांनी डॉक्टरांच्या प्रश्नांवरती संवाद साधतानाच काही राजकीय वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरती निशाणा साधला.

मेळाव्याला बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, डॉक्टरांना पेशंटचे नातेवाईक मारहाण करतात हा मुद्दा गेले काही दिवसांपासून चर्चेत आहे. वास्तव पाहता डॉक्टर सर्वच रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु उपचारादरम्यान रुग्ण दगावला तर भावनेच्या भरात डॉक्टरांना मारहाण होते. तसंच दवाखान्याचे नुकसान करण्यात येते. परंतु रुग्णांच्या नातेवाइकांनीदेखील डॉक्टरांची भूमिका समजून घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार म्हणाले. DCM Ajit Pawar At Indapur

रुग्णालयांना एसटीपी प्लांट कंपलसरी करण्यात आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत डॉक्टरांनी सतर्क असणे आवश्यक आहे. मात्र छोट्या रुग्णालयांना हा सगळा खर्च कसा परवडत नाही. या दृष्टिकोनातून सरकार निश्चित विचार करेल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिल.

Ajit Pawar
Amol Kolhe News : 'आमच्या गावासाठी पाच वर्षात काय केले?' करंदी ग्रामस्थांचा कोल्हेंना सवाल; अन् मग...

सून असल्या तरी बाहेरच्या मानणार नाही

डॉक्टरांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, प्रतिभाताई आणि कल्पनाताई या डॉक्टर गेवराई आणि बीडच्या आहेत. मात्र, तुम्ही आमच्याकडे सून म्हणून आला आहात. सून म्हणून आला असला तरी तुम्हाला आम्ही बाहेरच्या मानणार नाही. तुम्ही आमच्या घरच्या आहात तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानाचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.

हे रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही

'मी विकासाचा दृष्टिकोन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत गेलो आहे. मी सत्तेला हपापलेला नाही. मला राजकीय आयुष्यात अनेक पदं मिळाली. मी पाच ते सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो. एवढ्या वेळा उपमुख्यमंत्री होण्याचे रेकॉर्ड मला वाटत नाही कोणी तोडेल. कारण पाच सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायचं असेल, तर तेवढ्या वेळा निवडूनदेखील यायला हवं. आता काम नाही केलं की लगेच लोक याचं पार्सल बांधून बाजूला ठेवा आणि दुसऱ्याला संधी द्या,' अशी भूमिका घेत असल्याचं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Pune Lok Sabha : मुरलीअण्णा, कोल्हेंना गुरुवारचा मुहूर्त 'लाभ'दायी तर बारणेंना सोमवार लकी

'डॉक्टरांकडे लोक आल्यानंतर खरं खरं बोलतात. आपलं काय दुखणं आहे हे डॉक्टरांच्या पुढे मांडतात. त्यामुळे तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर त्याच्याशी संवाद साधा आणि त्याची काय राजकीय भूमिका आहे ती जाणून घ्या. जर आपल्याला पूरक अशी राजकीय भूमिका असेल तर त्याचा चांगला इलाज करा आणि जर तो विरोधी भूमिका असेल तर त्याला चांगलंच इंजेक्शन द्या. असा गमतीशीर संवाद यावेळेस अजित पवार यांनी डॉक्टर सोबत बोलताना साधला, यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

Edited by : Rashmi Mane

R

Ajit Pawar
Sharad Pawar News : जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, फडणवीसांच्या चार्टर विमानाचा खर्च वाया जाणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com