Amol Kolhe Vs Ajit Pawar : 'खरी राष्ट्रवादी कुणाची हे स्ट्राईक रेटवरून ठरवा' ; अमोल कोल्हेंनी अजित पवारांना डिवचलं?

Amol Kolhe on BJP : भाजपने दहा वर्षे मित्र पक्षांना ज्या पद्धतीने वागवलं आहे, त्यामुळे NDA च्या सरकारमध्ये परस्पर विश्वासाचा अभाव आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
Amol Kolhe Vs Ajit Pawar
Amol Kolhe Vs Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवारांना डिवचल्याचं समोर आलं आहे. तसेच, भाजप आणि महायुतीवरही टीका केली आहे.

'खरी राष्ट्रवादी कोणाची हे स्ट्राईक रेटवरून ठरवा', असं कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून म्हटलं आहे. याचबरोबर भाजपला सक्षम विरोधी पक्षाच्या सवय नव्हती. आता सक्षम विरोधी पक्ष समोर आहे. काँग्रेसने इशारा दिलाय, जेव्हा हवं तेव्हा हे सरकार पलटू शकतं.' असं कोल्हेंनी म्हटलं आहे.

याशिवाय 'संसदेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला गेलेला आहे, म्हणून काँग्रेसने डेप्युटी स्पिकरची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास लोकसभा स्पीकरसाठी निवडणूक होईल आणि तिथं फ्लोअर टेस्ट असेल.

तसेच, सरकार चालेल का? हा प्रश्नच आहे. भाजपने दहा वर्षे मित्र पक्षांना ज्या पद्धतीने वागवलं आहे, त्यामुळे NDA च्या सरकारमध्ये परस्पर विश्वासाचा अभाव आहे. असं सरकार असल्यास एक धक्क्याची गरज असते.' असंही अमोल कोल्हेंनी(Amol Kolhe) सांगितलं.

Amol Kolhe Vs Ajit Pawar
Ajit Pawar : लोकसभा निकालानंतर अजितदादांचे आमदार अलर्ट! अधिवेशनात 'हॉट इश्यू' लावून धरणार...

याचबरोबर 'शरद पवार(Sharad Pawar) धक्का देणार असतील अशी देशात चर्चा असेल, तर त्यांच्या राजकीय अनुभवाविषयी किती विश्वास आहे हे दिसून येतंय. संघर्षातून शरद पवार यांनी फिनिक्स फरारी घेतली आहे, खरी राष्ट्रवादी कुणाची हे स्ट्राईक रेटवरून ठरवा, एकीकडे 5 जागांपैकी 1 जागा, दुसरीकडे 10 पैकी 8 जागा म्हणजे 80 टक्के स्ट्राईक रेट, 20 मार्क मिळवलेल्याला पास की 80 वाला पास म्हणायचं?' असा सवालही अमोल कोल्हेंनी केला आहे.

Amol Kolhe Vs Ajit Pawar
Amol Kolhe : आता घरवापसीची गरजच काय? अमोल कोल्हेंची अतुल बेनकेंना वॉर्निंग!

तर 'Rss ने मुखपत्रातून अजित पवारांमुळे(Ajit Pawar) ब्रँड व्हॅल्यू घसरली असा थेट उल्लेख केलाय, यावरून त्यांच्यात धुसफुस, मतभेद सुरु आहेत हे चव्हाट्यावर आलं आहे. लोकसभेत मार खल्लाय, विधानसभेत 158 जागांवर महाविकास आघाडीवर पुढे म्हटल्यावर त्यांच्या मनात चलबिचल होणं साहजिक आहे.

तसेच, युती किंवा आघाडी होते तेव्हा वोट ट्रान्सफरचा मुद्दा महत्वाचा आहे. यावरून महायुतीच्या तिन्ही पक्षात एक वाक्यता नाही. त्यांना वाटत आहे आपल्या सोबत आलेल्या पक्षाची वोट ट्रान्सफर झाले नाहीत. ' असंही बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com