पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर त्यावरुन मोठे श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. बैलगाडा शर्यतीवरील (Bullock cart race) बंदी न्यायालयाने उठवली असली आहे. मात्र, शर्यतीवर असलेल्या आक्षेपांविरोधातील लढा यापुढेही अधिक डोळसपणे लढणार आहे. तरच बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळणे शक्य होईल. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी संसदीय आणि न्यायालयीन लढ्यात मांडणीत केलेला बदल महत्त्वाचा ठरला, असे मत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केले.
बंदी अठल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत 'सरकारनामा'शी संवाद साधत शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी अलीकडील काळात घडलेल्या घडामोडी स्पष्ट केल्या. यावेळी कोल्हे म्हणाले, या लढाईतील खरे श्रेय आणि प्रेरणा बैलगाडा मालकांची आहे. शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी महाविकास आघाडीचा स्टॅन्ड महत्त्वाचा ठरला. शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी सारखे वकील उभे केले. केवळ स्पर्धा परंपरेची मांडणी न करता गोवंश संवर्धन करण्यासाठी ही शर्यत कशी महत्त्वाची आहे. हे प्रभावीपणे मांडले, मांडणीत बदल केला. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांसोबत सगळ्यांची एकत्रित घेतलेली बैठक महत्त्वाची ठरली.
खासदार कोल्हे यांनी या पुढील लढाईची दिशा कशी असेल याबाबत बोलताना सांगितले. यापुढेही बैल प्राण्याला शासनाच्या संरक्षित प्राण्यांच्या यादीतून बाहेर काढण्याची लढाई महत्वाची ठरणार आहे. पाच सदस्यीय खंडपीठासमोर त्याकरता आणखी डोळसपणे मांडणी करावी लागेल. बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करावे लागेल. बैलगाडा शर्यतीमुळे गोवंशाची कशी काळजी घेतली जाते, बैलाला पोटच्या पोराप्रमाणे कसे सांभाळले जाते या सगळ्या गोष्टींचे सादरीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.
यासोबतच बैलगाडा शर्यतीची लोकप्रियता राज्यातील आणि देशातील कानाकोपऱ्यात वाढावी याकरता प्रयत्न करणार आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्याची क्षमता आहे. माझे कुटुंब, आमचे आजोबा बैलगाडा मालक होते, लहानपणापासून मी घाटात गाड्याला बैल जुंपले आहेत, असेही त्यांनी सांगितले. बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक रेल्वे, चाकणच्या वाहतूक कोंडी, पुणे शिरूर रस्त्यावर बहुमजली उड्डाणपूल उभारण्याचा विषय, राष्ट्रीय वनौषधी प्रकल्प असो फक्त मागणी करणे आणि डोळसपणे पाठपुरावा करून यश मिळवणे या दोन गोष्टीत फरक आहे. असा टोलाही त्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.