Sharad Pawar News : होय, मी भटकती आत्मा, पण...; शरद पवारांचे मोदींना उत्तर!

Shirur Lok Sabha Constituency : हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नव्हे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी, हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही कोणतीही तडजोड नाही..
Narendra Modi - Sharad Pawar
Narendra Modi - Sharad PawarSarkarnama

Shirur News : महाराष्ट्रात एक नेता आहे, ज्याने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले. ही राजकीय व्यक्ती भटकती आत्मा असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली होती. त्याला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जनतेसाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहील, जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील, असे उत्तर पवार यांनी दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एकमेकांवरील टीकेचा हा संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती, शिरूर, मावळ तसेच पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यात जाहीर सभा घेतली. रेसकोर्स मैदानावर ही सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, महाराष्ट्र राज्य एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. या खेळाला एका नेत्याने ४५ वर्षांपूर्वी सुरुवात केली. ज्या लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, अशी माणसे दुसऱ्याची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीत. असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बिघडवितात.

त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र (Maharashtra) अस्थिर झाला. काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. विरोधकांबरोबरच देश, राज्य, पक्ष आणि कुटुंबही या आत्म्याने अस्थिर केले. भाजपचे सरकार पाडण्याचा प्रयत्नही या आत्म्याने केला. या परिस्थितीत देशाला स्थिर सरकार हवे आहे. या अतृप्त, भटकत्या आत्म्यांपासून देशाला वाचविण्याची आवश्यकता आहे. भाजप-रालोआ सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल," असं मोदी यांनी पुण्यातील सभेत सांगितलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi - Sharad Pawar
Devendra Fadnavis : इलेक्शन जिंकण्याच्या प्रशिक्षणासाठी फडणवीसांनी अधिकाऱ्यांना इस्रायलला धाडलं?

मोदी यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी मंगळवारी सडेतोड उत्तर दिलं आहे. शरद पवार शिरूरच्या दौऱ्यावर आहेत. शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी झालेल्या प्रचार सभेत पवारांनी मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेत त्यांना उत्तर दिले.

पवार म्हणाले, होय, मी भटकती आत्मा आहे. जनतेसाठी मी शंभरवेळा अस्वस्थ राहील. जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील. मात्र, हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नव्हे तर शेतकऱ्यांचे (Farmer) प्रश्न सोडवण्यासाठी आहे. महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरदेखील पंतप्रधान मोदी यांनी टीका केली होती, त्यांच्या या टीकेचादेखील पवारांनी समाचार घेतला. राहुल गांधी यांच्या तीन पिढ्या देशासाठी झटल्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. गरिबी हटविण्यासाठी इंदिरा गांधींची (Indira Ghandi) हत्या झाली. आधुनिकेतवर देश पुढे जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली.

राहुल यांच्या वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात साहबजादे काय करणार? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारतात. त्यांना काहीतरी वाटले पाहिजे. राहुल यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. याबाबत बोलण्याऐवजी खोट्या गोष्टी सांगत, चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी मोदी करत आहेत. अशा लोकांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे, असं पवार म्हणाले.

R

Narendra Modi - Sharad Pawar
Narendra Modi Latest Speech : जनतेच्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्या 'कातिल पंजा'ला संधी देणार का? मोदींचा सवाल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com