Amol Kolhe News : कांदाप्रश्नी खासदार कोल्हे झाले अधिक आक्रमक; मंगळवारी आळेफाटा येथे 'रास्ता रोको' करणार

Onion 40 Percent Export Duty : केंद्र सरकारने कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केल्यावर त्यावर विरोधी पक्षांकडून राज्यभर सडकून टीका होऊ लागली आहे.
Amol Kolhe News
Amol Kolhe NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : केंद्र सरकारने कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केल्यावर त्यावर विरोधी पक्षांकडून राज्यभर सडकून टीका होऊ लागली आहे. त्यावर अजून किती दिवस शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहात? अशी संतप्त विचारणा शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) रविवारी (ता.२०) केली होती. त्यानंतर आता ते याप्रश्नी आता अधिक आक्रमक झाले असून (मंगळवारी ता.२३) आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे ते दोन महामार्ग रोखणार आहेत.

अगोदरच्या कांद्यावरील निर्यात धोरणामुळे खासदार कोल्हेंच्या मतदारसंघातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्यावर शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणाऱ्या केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशी संतप्त विचारणा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १० ऑगस्टला लोकसभेत कोल्हेंनी केली होती. दरम्यान, पुन्हा कांद्यावर या वर्षअखेरपर्यंत चाळीस टक्के निर्यात शुल्क लावताच ते पुन्हा संतापले. हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी तो ताबडतोब मागे घेण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राव्दारे केली.

Amol Kolhe News
Girish Mahajan News : संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवावीच : महाजनांचे आव्हान

दरम्यान, खासदार कोल्हे हे आता अधिक आक्रमक झाले आहेत. मोदी सरकारचा घोळ, शेतकऱ्यांचा बट्याबोळ करणाऱ्या कांदा निर्यात शुल्काविरोधात जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, पारनेर, संगमनेर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आळेफाटा येथील रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ये भावा, आपल्या शेतकरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी येतोय, तुम्हीही या, अशी भवनिक साद त्यांनी त्यासाठी घातली आहे.

Amol Kolhe News
Jaidatta Kshirsagar News : राजकीय स्वार्थासाठी कधीही निर्णय घेतला नाही; पुतण्याच्या हालचालींवर माजी मंत्री क्षीरसागरांची भूमिका

आगामी लोकसभा व चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाई आटोक्यात आणण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप कोल्हेंनी कांदा निर्यात शुल्कावर केला आहे. कांद्यातून दोन रुपये हाती पडतील अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली असता केंद्र सरकारने त्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याचे पाप केलंय. म्हणून या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आळेफाटा येथील दोन्ही महामार्ग रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com