
Pune Political News : महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्यानंतर, अखेर यूटर्न घेत महायुती सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाविकास आघाडीला जानकारांनी चकवा दिला असल्याचा बोललं जात आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने देशात फोफावलेल्या "हुकुमशाहीचे दहन" करण्यासाठी "हुकुमशाहीची होळी" खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हे म्हणाले, होळीमध्ये जे जे अमंगल असतं ते जळून खाक होतं त्याच पद्धतीने महागाई भ्रष्टाचार, बेरोजगारी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार आणि महाराष्ट्राला गद्दारीच्या माध्यमातून लागलेली कीड यासारख्या सगळ्या अभद्र गोष्टींची आज होळी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी दर्शविल्यानंतर अचानक त्यांनी महायुतीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, 'महादेव जानकर यांनी घेतलेला भूमिकेमुळे आम्हाला चकवा बसला नसून हा आपकी बार चार सो बार म्हणणाऱ्या भाजपला जनतेने जो चकवा दिलाय तो महत्त्वाचा आहे. आपकी बार 400 बार म्हणत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही उत्साह वाढताना दिसत नाही.'
तसेच, 'भाजपने हरियाणातील मुख्यमंत्री बदलून पाहिले आणि आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमीरा लावला आहे. बंगालमधील मंत्र्यांच्या मागेही अशाच पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत एवढं करूनही 400 चा फॉर्मुला पार होत नाही.'
याशिवाय, 'महाराष्ट्राचा विचार केला तर 48 लोकसभा जागांपैकी 45 जिंकण्याचा नारा भाजप गेल्या काही दिवसांपूर्वी देत होतं मात्र आता तो नारा ऐकायला मिळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना फोडून आणि मनसेला सोबत घेऊन देखील हा आकडा काढता येत नसल्याने छोट्या छोट्या घटक पक्षांना देखील सोबत घेण्याची वेळ आली आहे. यातून आपल्याला महाराष्ट्रातील जनतेची मनस्थिती काय आहे हे कळून येते. महाराष्ट्रातील जनतेने महायुती सरकारला नाकारण्याचे निश्चित केलं आहे.' असंही कोल्हे यांनी सांगितलं.
याचबरोबर 'महादेव जानकर यांच्याबाबत काय झालं हे वरिष्ठ पातळीवर लोक सांगू शकतात. कारण जानकर यांच्याशी वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत होती. मात्र 2014 मध्ये भाजपला स्वबळावर 300 जागा मिळाल्यानंतर भाजपने मित्र पक्षांना जी वागणूक दिली आहे. तसेच आत्ता महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला देखील भाजपकडून जी वागणूक दिली जाते आहे. त्यामुळे संबंधित पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे.
ज्यांच्याकडे 40 आमदार आहेत ते चार जागांवरती घासाघीस करत आहेत. त्यामुळे त्यांचं नक्की वजन काय याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही आलबेल नसलेली परिस्थिती सध्या महायुतीची आहे.' असं म्हणत खासदार कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला.
तर 'आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणाऱ्या प्रवेशाबद्दल बोलताना कोल्हे म्हणाले जे आढळराव आतापर्यंत घड्याळाविरोधात लढत होते ते आता घड्याळ चिन्हावरती लढणार आहेत. त्यामुळे भविष्यात लाव रे तो व्हिडिओची गंमत आपल्याला पाहायला मिळेल. तसेच आगामी निवडणुकीमध्ये निष्ठेला किती किंमत आहे हे दिसून येईल आणि महाराष्ट्रातील जनता हे दाखवून देईल.' असं अमोल कोल्हे म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.