Laxman Jagtap
Laxman Jagtap Sarkarnama

शेतातील कोथिंबीर विकून लक्ष्मण जगताप पहिल्यांदा नगरसेवक झाले होते; चंद्रकांत पाटलांनी सांगितली आठवण

Pimpri-Chinchwad : लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे या महिन्यात (ता.३) कर्करोगाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल (ता.१४) पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना लक्ष्मणभाऊंनी १९८६ ला पहिल्यांदा नगरसेवकाची निवडणूक ही आपल्या शेतातील कोथिंबीर विकून जिंकली होती, याची आठवण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितली.

लक्ष्मणभाऊ हे नेता असले, तरी मित्रही असल्याने त्यांची भीती वाटत नव्हती, असे चंद्रकांतदादा म्हणाले. २००४ ला तिकिट न मिळाल्यानंतरही शरद पवार यांनी सांगितल्यावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. याला त्यांनी उजाळा देत दिलेल्या शब्दांचे ते कसे पक्के होते हे सांगितले.

जगताप कुटुंब आणि भाऊंचे कार्यकर्ते, हितचिंतक यांना जे जे वाटेल ते ते करू, असा शब्द त्यांनी दिला. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांची निष्ठा पाहिली. त्यांच्यासारखी निष्ठा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.

Laxman Jagtap
Sudhir Tambe : निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

भाजपात येण्यापूर्वीपासून भाऊंशी राजकारणापलिकडची मैत्री होती. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहायची वेळ येईल, असे वाटले नव्हते, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले. या भागाला जेव्हा गरज होती, तेव्हाच ते गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. म्हणाले, व्यवसायातही त्यांनी वेगळी छाप उमटवली. जिद्द, तळमळ, इच्छाशक्ती असणारा चांगला मित्र गमावला, असे ते म्हणाले.

Laxman Jagtap
Old Pension Scheme News : राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीसांचे सूचक वक्तव्य

मावळच्या भंडारा डोंगरावरील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मंदिराचे भाऊंचे स्वप्न संत तुकाराम महाराजांच्या आशिवार्दाने त्यांचा लहान भाऊ म्हणून पूर्ण कऱणार असल्याचे माजी मंत्री तथा मावळचे माजी आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी सांगितले.

तर, पिंपरी-चिंचवड शहराचे विकासपुरुष असा भाऊंचा उल्लेख भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. नात्यापलिकडे आमची मैत्री होती, असे ते म्हणाले. त्यांनी भाऊंची पहिली आमदारकी ते पहिल्या आणि शेवटच्या खासदारकीच्या (२०१४) निवडणुकीपर्यंतच्या आठवणी सांगितल्या.

Laxman Jagtap
Bjp News : पंकजा मुंडेंना ऑफर देणाऱ्या खैरेंनाच भाजपमध्ये येण्याची गळ..

पिंपरीचे शिवसेनेचे माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, आरपीआयच्या (आठवले) नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले, भाजपचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, कष्टकरी नेते काशिनाथ नखाते, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, प्रहारचे संजय गायखे, राष्ट्रीय समाज पक्षाचे भारत महानवर आदी व्यासपीठावर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com