Sunil Shelke, Ajit Pawar, Nilesh Lanke
Sunil Shelke, Ajit Pawar, Nilesh LankeSarkarnama

Ajit Pawar and NCP : ...अन् राष्ट्रावादीला शेळके, लंके यांच्या रुपाने हिरे सापडले; अजित पवारांनी सांगितला किस्सा

NCP MLA : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना कायम संधी देणार असल्याचेही केले स्पष्ट

Sunil Shelke and Nilesh Lanke : सर्वांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे संधी दिली जाते, असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण याच्या माणसे हेरण्याबाबत माहिती दिली. त्याच पद्धतीने आमदार सुनील शेळक आणि निलेश लंके यांच्या निवडीचा किस्साही त्यांनी 'साम' वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितला.

Sunil Shelke, Ajit Pawar, Nilesh Lanke
Ajit Pawar on Baramati Pattern : 'बारामती पॅटर्न' देशभर प्रसिद्ध का?; अजित पवारांनी सांगितलं कारण

१९९५ मध्ये आर. आर. पाटील, सुनील तटकरे, अजित पवार हे फायर ब्रिगेड म्हणून ओळखले जात होतात. त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "शरद पवार (Sharad Pawar) आणि यशवंतराव चव्हाणसाहेब हे समजातील चांगली माणसे हेरत होते. त्यांना योग्य संधी देत होती. पवारांनी १९९० ला दिलीप वळसेपाटील, जयंत पाटील (Jayant Patil), आर. आर. पाटील, अजित पवार, सुनील तटकरे यांना संधी दिली. त्यानंतर आम्ही आपापल्या पद्धतीने काम करत आलो. १९९९ स्वाभीमानातून राष्ट्रवादीची स्थापना झाली. शेवटी राज्य पुढे नाताना सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जावे लागते. त्यासाठी संबंधित भागातील प्रश्नांची जाण असणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा लागतो. त्यांना पारखावे लागते. अशी माणसे हेरून त्यांना संधी द्यायची असते. आम्हाला तरुण वयात संधी मिळाल्याने आम्हाला बरेच शिकता आले."

Sunil Shelke, Ajit Pawar, Nilesh Lanke
Ajit Pawar Interview : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? अजित पवारांनी दिलं दिलखुलास उत्तर

ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण, संघटना कौशल्य, लोकांना पुढे घेऊन जाण्याची क्षमता असेल अशा मंडळींना संधी दिली पाहिजे, असे स्पष्ट मत अजितदादांनी (Ajit Pawar) व्यक्त केले. अजित पवार म्हणाले, माझे सुनील शेळके (Sunil Shelke) आणि निलेश लंके यांच्यावर बारकाईने लक्ष होते. त्यांची आमदार होण्याची इच्छा मला माहिती होते. मात्र एक होते भाजपमध्ये एक होते शिवसेनेत. माळातून भाजप बाळा भेगडे यांना तिकीट देईल, याची खात्री होती. त्यामुळे मी तिकीटाची घोषणा होईपर्यंतच वाट पाहत होतो. भाजपने उमेदवारी घोषीत केल्यानंतर आमच्याकडे येण्यापूर्वीच मी मावळातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या नाव जाहीर केले. निलेश लंके यांच्याबाबतही तसेच घडले."

Sunil Shelke, Ajit Pawar, Nilesh Lanke
Ajit Pawar Interview : 'ठाकरेंसोबत आनंदाने तर चव्हाणांच्या काळात नाईलाज..' ; अजित पवार असं का म्हणाले?

राष्ट्रवादी पक्षात तरुणांना कायम संधी देणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "पवारसाहेब आणि चव्हाणसाहेब हे नेते माणसे हेरत होते. तेच त्यांच्याकडून शिकलो. हिरे कुठे आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे. कधीकधी हिरे शोधता शोधता हातात गारगोटीच लागते. किंवा खोटा हिरा लागतो. त्यामुळे निवडणाऱ्याला समजले पाहिजे की खोटा हिरा कुठला आणि खरा हिरा कुठला ते. आताही यापुढे सुनील शेळके आणि निलेश लंके (Nilesh Lanke) त्यांच्यासारखे हिरे शोधण्याचा प्रयत्न आहे. आजही पक्षात अनेक तरुण आहेत. नगरमधील असलेली सहाही जणांची टीम तरुण आहे. पुण्यात मी आणि दिलीप वळसे पाटील सोडलो तर पुण्यातील दहा आमदारही तरुणच आहेत. सगळे दुसे-चौसे आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com