Anjali Damania News : अंजली दमानियांनी पुण्यात येऊन अजितदादांना घेरलं; पहिल्यांदाच स्वित्झर्लंडचा उल्लेख करत थेट 'अर्थ'कारण काढलं...

Anjali Damania targets Ajit Pawar in Pune : मी राज्याच्या अर्थमंत्र्यांबद्दल बोलत असून महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड देशा इतका मोठा आहे. महाराष्ट्र हे एका स्वित्झर्लंड देशा एवढं मोठं राज्य असताना त्याचे जे अर्थमंत्री आहेत ते दहावी पास आहेत, असे दमानिया म्हणाल्या आहेत.
Anjali Damania News : अंजली दमानियांनी पुण्यात येऊन अजितदादांना घेरलं; पहिल्यांदाच स्वित्झर्लंडचा उल्लेख करत थेट 'अर्थ'कारण काढलं...
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र कर्जामध्ये बुडाला असून सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. मात्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांना याबाबत काहीच कळत नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. महाराष्ट्र स्वित्झर्लंडपेक्षा मोठा असून अर्थमंत्री मात्र दहावी पास आहेत, असे दमानिया म्हणाल्या.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. दमानिया म्हणाल्या, सध्या राज्यामध्ये कबूतर आणि हत्तीवरून राजकारण सुरू आहे. सगळ्या शुल्लक गोष्टींवर राजकारण सुरू असून 9 लाख कोटींचं महाराष्ट्रावर सध्या देणं आहे. त्याबाबत कोणताही राजकारणी बोलायला तयार नाही.

आपले सध्याचे अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही. असेट काय आहेत लायबिलिटीज काय आहेत, एवढे नऊ लाख कोटी आपण आणार कुठे आहोत? यासाठी अजित पवार यांच्याकडे वेळ नाही अथवा त्यांना कळतही नसेल, असं म्हणत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली.

Anjali Damania News : अंजली दमानियांनी पुण्यात येऊन अजितदादांना घेरलं; पहिल्यांदाच स्वित्झर्लंडचा उल्लेख करत थेट 'अर्थ'कारण काढलं...
Indira Gandhi News : काँग्रेसच्या बड्या नेत्याचं इंदिरा गांधींबाबत खळबळजनक विधान; म्हणाले, 'त्या' निर्णयाची किंमत चुकवावी लागली...

दमानिया म्हणाल्या, मी राज्याच्या अर्थमंत्र्यांबद्दल बोलत असून महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड देशा इतका मोठा आहे. महाराष्ट्र हे एका स्वित्झर्लंड देशा एवढं मोठं राज्य असताना त्याचे जे अर्थमंत्री आहेत ते दहावी पास आहेत. मला त्यांच्या शिक्षणावरती टीका करायची आहे असं नाही. मात्र अर्थकारण त्यांना कळतं का? हा मूळ प्रश्न असल्याचा अंजली दमानिया म्हणाल्या.

Anjali Damania News : अंजली दमानियांनी पुण्यात येऊन अजितदादांना घेरलं; पहिल्यांदाच स्वित्झर्लंडचा उल्लेख करत थेट 'अर्थ'कारण काढलं...
IPS Puran death case : IAS पत्नीचा पोलिसांना जोरदार दणका; अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील ‘ते’ कलम घडविणार जन्माची अद्दल...    

मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली की, त्यानंतर मला असा प्रश्न पडला की, ती लोकं आता खाणार काय? परिस्थिती पाहिल्यानंतर त्यानंतर आपल्या परीने जमेल तेवढी आम्ही मदत केली. मात्र सध्याच्या सरकारकडे फक्त मतं फोडण्यासाठी पैसा आहे. पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे. मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही, अशी टीका अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सरकारवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com