Baramati NCP News : बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्या अंकिता पाटील - ठाकरे यांनी बारामती जिंकणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. त्यामुळे 'ए फॉर अमेठी झालं तसंच बी फार बारामती होणार.' असं म्हटलं होतं, त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपचे नेते आणि माजीमंत्री हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) यांच्या कन्या अंकिता ठाकरे या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या देखील राहिल्या आहेत. त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौराही केला. त्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा जिंकण्याबाबतची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. यावर विकास लवांडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लवांडे म्हणाले, ''ठाकरे या इंदापूर मधून पराभूत झालेल्या माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांना इतकंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या कुटुंबातून आलात ते पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव बाजीराव पाटील हे काँग्रेसचे विचारांचे एकनिष्ठ कुटुंब होतं.
त्या विचारधारेत तुम्ही वाढलेल्या असताना हर्षवर्धन पाटील यांना EDची नोटीस आणि अटक होण्याची भीती वाटली असल्याने ते भाजपच्या वळचणीला गेले आणि भाजपवासी झाले. त्यानंतर त्यांना आता सुखाने झोप लागत असल्याचे त्यांनी स्वतः बोलून दाखवलं आहे.''
याचबरोबर ''भाजपने बारामतीमध्ये लोकशाही पद्धतीने लढायला आमची हरकत नाही. पण तुम्हाला अजून उमेदवार देखील मिळाला नाही. आधी तुमचा उमेदवार ठरवा आणि नंतर निवडणूक लढवण्याच्या वल्गना करा.'' तसेच ''सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांचे काम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या घराघरात पोहोचलेल आहे. तर, देखील आज अजित पवार तुमच्या साथीला आल्याने तुम्ही त्याआधारे काही बोलत असाल. तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे .'' असे लवांडेंनी म्हटलं.
याशिवाय ''शरद पवार(Sharad Pawar) यांच्या विचारावर विश्वास ठेवून जनता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनाच निवडून देणार आहे. त्यामुळे तुम्ही बारामती जिंकण्याची भाषा करण्याच्या आधी तुमचा उमेदवार ठरवा.'' असं चॅलेंज लवांडे यांनी दिलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.