
Ind Vs Pak Asia Cup: आशिया कप क्रिकेट सीरीजमध्ये उद्या अर्थात १४ सप्टेंबर रोजी दुबईत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. पण या क्रिकेट सामन्यावरुन देशभरात मोठं वादळ निर्माण झालं आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते तसंच पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी या सामन्याला विरोध दर्शवला आहे. पाकिस्ताननं भारतात पहलगाम सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणला अद्यापही दहशतवादी हल्ले सुरुच आहेत. त्यामुळं पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामनाही खेळवला जाता कामा नये.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, सेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कडाडून विरोध केला आहे. केजरीवाल यांनी भाजप सरकारवर निशाणा साधताना ट्विट केलं की, पंतप्रधानांना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची गरजच काय पडली आहे. संपूर्ण देशाचं म्हणणं आहे की, हा सामना होता कामा नये. मग तरीही हा सामना का खेळवला जात आहे. हे देखील ट्रम्प यांच्या दबावाखाली केलं जात आहे का? शेवटी ट्रम्प यांच्या पुढे इतकं का झुकावं लागतं आहे? असे अनेक सवाल विरोधकांनी सरकारला विचारले आहेत.
आपचे दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेतून आरोप केला की, पाकिस्तानी क्रिकेटरांनी ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय महिलांची खिल्ली उडवली. त्यांनी दावा केला की, एका पाकिस्तानी खेळाडूनं इन्स्टाग्रामवर असा फोटो पोस्ट केला की, ज्यामध्ये भारतीय महिलांना तिरंगा रंगाची साडी नेसलेलं दाखवण्यात आलं आहे. तसंच पाकिस्तानी लष्कर प्रमुख असिम मुनीर त्या महिलेला सिंदूर लावत असल्याचं दाखवलं आहे. त्यामुळं इतक्या नीच पातळीवर जाऊन जर पाकिस्तानी खेळाडू वागत असतील तर आम्ही केंद्र सरकारकडं मागणी करतो की, त्यांनी भारतीय टीमला तात्काळ दुबईतून भारतात बोलवावं. तसंच दिल्लीमध्ये जर कोणत्याही क्लबनं किंवा रेस्तराँनं भारत-भाकिस्तान सामन्याचं प्रक्षेपण केलं तर आम्ही त्यांना उघड पाडू.
उद्धव ठाकरेंनी देखील या सामन्याला विरोध केला आहे. त्यांनी म्हटलं की, भारत-पाकिस्तान सामना होणं हा राष्ट्रीय भावनेचा अपमान आहे. जेव्हा भारतीय सैनिक सीमेवर शहीद होत आहेत तेव्हा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं ही देशभक्तीची थट्टा आहे. जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानी खेळाडू जावेद मियांदाद यांना ठणकावून सांगितलं होतं की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला बळ देत राहील भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार नाही. तसंच उद्धव टाकरेनी इशारा दिला की, उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात महाराष्ट्रभर निषेध आंदोलन केलं जाईल.
प्रियंका चतुर्वेदी भडकल्या म्हणाल्या, अमेरिकेतून शेअर केलेल्य व्हिडिओ संदेशात त्या म्हणतात, आपण जेव्हा यासंदर्भात बीसीसीआयच्या चेअरमनला पत्र लिहिलं होतं तसंच यावर संसदेत देखील मुद्दा उपस्थित केला होता. पहलगाम हल्ल्यात २६ लोक शहीद झाले, २६ महिला विधवा झाल्या. आपण सर्वांनी ठरवलं होतं की पाकिस्तानसोबत चर्चा होणार नाही किंवा व्यापारही होणार नाही. मग आता अचानक क्रिकेट सामन्याचं आयोजन का? जर ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरु आहे तर मग बीसीसीआयला पाकिस्तानसोबत सामना खेळण्याची परवानगी कोणी दिली?
भाजपचे खासदार आणी माजी क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या सामन्यासंदर्भातील एका नियमावर बोट ठेवलं आहे. त्यांनी म्हटलं की, भारत-पाकिस्तान या देशामध्ये क्रिकेट सामन्यांची सिरीज होत नाहीए. भविष्यातही होणार नाही. पण ACC आणि ICC सारख्या मल्टिनॅशन टुर्नामेंटमध्ये खळणं ही आपली मजबुरी असते. जर भारत पाकिस्तानसोबत खेळला नाही तर मग ऑकओव्हर मिळेल आणि याचे अंक पाकिस्तानला मिळतील. भारतानं सामना खेळण्यास नकार दिल्यास उलट त्याचा पाकस्तानी संघालाच फायदा होईल. पण भविष्यात आपण या दोन्ही देशांमध्ये सिरीज खेळवणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.