APMC Pune News : पुणे बाजार समिती; अजितदादांच्या पॅनेलला सर्वपक्षीयांचे आव्हान !

Pune Market Commitee Election : 'राष्ट्रवादीसमोर राष्ट्रवादीच उभी ठाकल्याचे चित्र..'
APMC Pune News :  Pune Market Commitee Election :
APMC Pune News : Pune Market Commitee Election :Sarkarnama
Published on
Updated on

APMC Pune News : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत १८ जागांसाठी निवडणूकीत एकूण १९५ अर्ज वैध ठरले होते. यामध्ये गुरूवारपर्यंत (ता.२०) १३८ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे समितीच्या निवडणुकीत ५७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बाजार समितीची निवडणूक तब्बल २० वर्षांनंतर होत असल्याने यामध्ये रंगत आली आहे.

APMC Pune News :  Pune Market Commitee Election :
Nanded Market Committee News : अशोक चव्हाणांनी महाविकास आघाडीची मोट बांधलीच ; एक उमेदवार बिनविरोध..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) या निवडणुकीत जोरदार शक्ती लावली आहे. राष्ट्रवादीची ताकद लक्षणीय असली तरी, भाजपनेही ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विकास दांगट हे भाजपचे (BJP) प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनेलमधून उभे आहेत. रोहिदास उंद्रे, शुक्राचार्य वांजळे, दिलीप काळभोर, प्रकाश जगताप या उमेदवारांनी सर्वपक्षीय पॅनेलमधून राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केले आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान, असेच चित्र असल्याचे स्पष्ट होत आहे.

APMC Pune News :  Pune Market Commitee Election :
Girish Mahajan News : मतदानाआधीच गिरीश महाजन दोन जागा जिंकले!

सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून ७ जागांसाठी २१ उमेदवार, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गातून १ जागेसाठी २ उमेदवार, सेवा सहकारी संस्था विमुक्त/ भटक्या जातीमधून १ जागेसाठी २ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून २ जागांसाठी ६ उमेदवार, ग्रामपंचायत अनु. जाती जमाती गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून १ जागेसाठी २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

APMC Pune News :  Pune Market Commitee Election :
Sangharsh Yatra News : आंदोलन उधळण्याचा प्रयत्न उधळून लावू, आता टॅंकर घेऊन दिल्लीला जाऊ !

व्यापारी-अडते मतदार गटातून २ जागांसाठी १२ उमेदवार, हमाल-तोलणार गटातून १ जागेसाठी ५ उमेदवार निवडणूक लढवीत असून बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी तब्बल ५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूकीत उमेदवारांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांच्या गाठी भेटू सुरू केल्या आहेत. चिन्ह वाटप केल्यानंतर प्रचाराचा आणखी जोर वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com