Nanded Market Committee News : अशोक चव्हाणांनी महाविकास आघाडीची मोट बांधलीच ; एक उमेदवार बिनविरोध..

Congress : काॅंग्रेसचे गोविंद गोदरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बारसे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
Nanded Market Committee News
Nanded Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan : नांदेड बाजार समितीवरची (Nanded Market Committee) सत्ता कायम राखण्यासाठी महाविकास आघाडी झाली पाहिजे यासाठी काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले. कुठलाही वाद किंवा ताणाताणी न होवू देता त्यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली. आघाडीचा एक उमेदवार देखली बिनविरोध निवडून आणत खातेही उघडले. आता महाविकास आघाडीचा थेट सामना भाजप-शिंदे युतीच्या पॅनलशी होणार आहे.

Nanded Market Committee News
Hingoli Market Committee : राष्ट्रवादीला बाजूला सारत, काॅंग्रेस-भाजप व दोन्ही सेना एकत्र...

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी आत ४३ उमेदवार रिंगणात आहेत. (Mahavikas Aghadi) महाविकासआघाडीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे बिनविरोध निवडून आले आहेत. आघाडीच्या जागा वाटपात १८ जागांपैकी कांग्रेसला १३, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन तर (Shivsena) शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे (Bjp) भाजपा-शिवसेना प्रणित पॅनलने सक्षम उमेदवार देत महाविकास आघाडी समोर आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.

कांग्रेसचे गोविंद गोदरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बबनराव बारसे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले असून सोसायटी सर्वसाधारण गट भगवानराव आलेगावकर, श्यामराव पाटील टेकाळे, भूजंग पाटील डक, गांधी पवार,निलेश देशमुख, नागोराव आढाव, सत्यजीत भोसले. महिला राखीव गायत्री गजानन कदम, कमलबाई रंगनाथ वाघ, ओबीसी प्रवर्गात बबनराव बारसे बिनविरोध.

भटके विमुक्त निळकंठ मदने, ग्रामपंचायत सर्वसाधारण संजय देशमुख लहानकर, गंगाधर शिंदे धनेगावकर, अनुसूचित जाती जमाती नाना पोहरे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट ज्ञानेश्वर राजेगोरे ,आडते व व्यापारी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सदाशिवराव देशमुख. हमाल मापारी भुजंग कसबे हे उमेदवार आहेत.

चिखलीकरांनी दिले तगडे उमेदवार..

बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती झाली असून युतीच्या पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. सोसायटी सर्वसाधारण गट- मोतीराम पाटील मोरे, दत्ता पाटील पांगरीकर, प्रताप पावडे, डॉ लक्ष्मण इंगोले, गणेश कदम, रामदास गिरे, प्रभाकर नवले, महिला राखीव- वेणूबाई क्षीरसागर, पारुबाई बोडखे, भटके विमुक्त प्रवर्गातून देविदास सरोदे.

Nanded Market Committee News
Paithan Market Committee : भुमरेंकडून भाजपला ठेंगा, तरी शिंदे गटासाठी काम करणार..

तर ग्रामपंचायत सर्वसाधारण संभाजी पाटील पूय्यड, विठ्ठल पावडे, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून दिगांबर टिपरसे. आर्थिक दुर्बल गट- तुळशीराम बंडाळे, आडते व‌ व्यापारी गटातून प्रल्हाद बागल, विठ्ठल देशमुख, हमाल मापारी गटातून रुपेश भदरगे हे उमेदवार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर नऊ पक्षही निवडणूकीत उभे असुन यात रमेश मेटकर, छगन सांगोळे, कमलेश कदम,विनय मोरे किशन गव्हाणे, शिवाजी दराडे,आयुब खान पठाण, दिगंबर सरोदे आदी आपले नशीब आजमावत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com