Sangharsh Yatra News : आंदोलन उधळण्याचा प्रयत्न उधळून लावू, आता टॅंकर घेऊन दिल्लीला जाऊ !

Nagpur : पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला.
Nitin Deshmukh with others
Nitin Deshmukh with othersSarkarnama
Published on
Updated on

जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घेऊन नागपूरला पोहोचलो असता उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला. आता नव्या दमाने जिल्ह्यातील प्रश्नांवर महामोर्चा काढू, असा इशारा शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषदेत दिला आहे.

नागपूरच्या सीमेवर धामणा येथे गुरुवारी सकाळी नागपूर पोलिसांनी संघर्ष यात्रा काढणारे आमदार नितीन देशमुख व समर्थकांना ताब्यात घेतले. त्यानंतर सहा लक्झरी बसमध्ये शिवसैनिक आणि नागरिक व पोलिसांच्या गाडीत आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी अकोला येथे सोडले. दुपारी १ वाजता अकोल्यात आल्यानंतर आमदार देशमुख यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले. पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांना सोडून दिले.

आमदार देशमुख यांनी त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन घडलेला प्रकार कथन केला. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडीच्या देवश्री ठाकरे, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवणीकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा व आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत नागपूरपर्यंत संघर्ष यात्रेत सहभागी झालेले शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

...तर टँकर घेऊन दिल्लीला जाऊ !

ज्या पाण्याने स्वतःच्या किडण्या खराब झाल्या, वडिलांच्या किडण्या गेल्या, पूर्वजांचेही तेच हाल झालेले आहे, तेच दोन हजार टीडीएस असलेले पाणी खारपाणपट्टयातील माय स्वतःच्या लेकराले पाजते, त्यावेळची तिची भावना समजून घेतली पाहिजे. ही भावना समजून घेत आम्ही उपमुख्यमंत्र्यांना पिण्यासाठी खारपाणपट्ट्यातील पाणी घेऊन गेलो होते.

ते पाणी देऊन ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता रद्द करणारा आदेश मागे घेण्याची विनंती करणार होतो. मात्र, त्यापूर्वीच आम्हांला अडविण्यात आले. आताही पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली नाही तर हेच खाऱ्या पाण्याचे टँकर घेऊन आम्ही दिल्लीला जाऊ, असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.

Nitin Deshmukh with others
Nitin Deshmukh Breaking News : ठाकरे गटाचे फायरबॅंड नेते नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात,नागपुरात जलसंघर्ष यात्रा रोखली

माझ्या जिवाला धोका..

आमदार नितीन देशमुख यांनी माझ्या जिवाला धोका असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. नागपूर येथे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पोलिसांवर गृहमंत्र्यांचा प्रचंड दबाव असल्याचे सांगून तुमच्याही जिवाला धोका असल्याचे सांगितल्याचे आमदार देशमुख म्हणाले. त्यासोबतच माझी सुरक्षा करण्यासाठी मी सक्षम असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांची पाठ..

अकोला जिल्ह्यात पारस येथे दुर्दैवी घटना घडून सात नागरिक ठार झाले. धामणदरी येथे चार विद्यार्थिनीवर अत्याचार झाला. एका अंध महिलेवर अत्याचार झाला. या घटना घडल्या असतानाही राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्याकडे फिरकलेही नाहीत. त्यांना पीडितांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन करावेसे वाटले नाही. जिल्ह्यात कायद्याचे राज्य राहिले नाही. त्यामुळे आता नागरिकांच्या प्रश्नावर महामोर्चा काढणार असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.

Nitin Deshmukh with others
Nitin Deshmukh : पंतप्रधान मोदींच्या फोटोमुळे शिवसेनेला तोटाच; नितीन देशमुखांनी मांडलं गणित

वाण धरणावरील आंदोलन म्हणजे नौटंकी..

वाण धरणातील पाणी आरक्षित करू, नये यासाठी लोकजागर मंचाचे अनिल गावंडे यांनी धरण परिसरात आंदोलन सुरू केले आहे. याबाबत आमदार नितीन देशमुख यांना विचारले असता हा प्रकार म्हणजे नौटंकी असल्याचे ते म्हणाले. बाळापूर तालुक्यातील लेकी तेल्हारा तालुक्यात दिल्या असतील तर तिच्या भावासाठीच आम्ही तेल्हारा तालुक्यातून पाणी आणत आहो. राहिला प्रश्न कवठा बॅरेजमधून पाणी घेण्याचा तर येथून पाणी लिफ्ट करून घ्यावे लागेल. त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च होईल.

नुकतेच भाजपचे आमदार जिल्हा परिषदेत पाण्यासाठी जाऊन आले. वीज पुरवठा होत नसल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. तोच प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून थेट वाण धरणातून साठवण टाकीपर्यंत पाणी आणण्याकरिता वाण धरणाचा पर्याय निवडला. यात नागरिकांचेच हित आहे, असे आमदार देशमुख म्हणाले.

Nitin Deshmukh with others
Akola Lok Sabha : अकोल्यासाठी ठाकरे-आंबेडकरांनी जुळवलेले गणित; पवारांच्या गुगलीमुळे फिस्कटले?

उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात फोडले टरबूज..

आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) व संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या शिवसैनिक व नागरिकांना घेऊन नागपूर पोलिस अकोल्यात (Akola) दाखल झाले असता नेहरू पार्क जवळ शिवसेना (Shivsena) शहर प्रमुख राजेश मिश्रा व निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवणीकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आमदारांचे स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी निदर्शने करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा निषेधार्थ रस्त्यावरच टरबूज फोडले. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com