Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पाचे उद्योगनगरीत कौतुक अन् टिकाही

Pimpri-Chinchwad : शिंदे गट म्हणतो अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा, तर राष्ट्रवादी म्हणते सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा
Union Budget 2023
Union Budget 2023 Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे उद्योगनगरीत युतीकडून स्वागत करण्यात आले. तर, त्याचवेळी आघाडीने मात्र, त्यावर सडकून टीका केली.

मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधीत्व करणारे मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सर्व घटकाला त्यातही मध्यमवर्गाला त्यात मोठा दिलासा मिळाला असून औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे त्यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Union Budget 2023
Congress News; हा तर निवडणुकांसाठीचा फसवा अर्थसंकल्प!

सामान्यांना दिलासा

या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य नागिरकांना दिलासा दिला असल्याचे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष आणि भोसरीचे पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. कारण सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यात महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.म्हणून तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्यावतीने आम्ही त्याचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.

देशाला नवी दिशा देणारा

आजचा अर्थसंकल्प हा देशाला नवी दिशा देणारा असून तो सर्व आर्थिक बाजूचा विचार करून मांडला आहे, असं मत भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त केलं. शहरी व ग्रामीण भागाचा समतोल त्यात राखला गेला आहे, असे ते म्हणाले.

सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली

या अर्थसंकल्पाने सामान्यांचा भ्रमनिरास करीत त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी दिली. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) व उद्योगपती गौतम अदानी यांनाच अमृत मिळाले असून १२५ कोटी भारतीयांच्या वाटेला मात्र विष आले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

मेक-इन-इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी याचा उल्लेख त्यात उल्लेख नसल्याचे सांगत हे म्हणजे मोदी सरकारचं "पुढचं पाठ आणि मागचं सपाट" असंच म्हणावं लागेल, अशी टीका त्यांनी केली. त्यातून महाराष्ट्राला काहीच मिळालं नसून दुसरीकडे विधानसभेची निवडणूक असल्याने कर्नाटकला, भरभरून दिले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्राप्तीकर मर्यादा फक्त पन्नास हजाराने वाढवून तीन लाख करणे हा मोठा दिलासा नाही, असेही ते म्हणाले.

Union Budget 2023
Ambadas Danve On Budget : अपयशी शिंदे-फडणवीसांमुळे बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय..

गुलाबी स्वप्ने दाखवणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थसंकल्पात महागाईवर कोणताही दिलासा नसून उलट ती त्यामुळे वाढणार आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली. त्यात बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही.

शैक्षणिक बजेट 2.64 टक्के वरून 2.5 टक्के पर्यंत कमी करणे दुर्दैवी आहे, आरोग्य बजेट 2.2 टक्के वरून 1.98 टक्के पर्यंत कमी करणे हानिकारक आहे, असे ते म्हणाले. यातून उलट देशाला आणखी कर्जाच्या सापळ्यात बुडवले आहे. महाराष्ट्राला गुलाबी स्वप्ने दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

Union Budget 2023
Politics : अर्थसंकल्पावर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सोडले नाही

घोर निराशा करणारा अर्थसंकल्प

गरीब व मध्यमवर्गीय तसेच समस्त शेतकरी बांधवांची घोर निराशा करणारा हा अर्थसंकल्प असून त्यात कृषिप्रधान देशात शेतीसाठी सर्वात कमी तरतुद केल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी युवकचे पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) अध्यक्ष इम्रान शेख यांनी केला आहे. बेरोजगारी दूर करण्याचे धोरण त्यात नाही. फक्त आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आकडे फुगवून सादर केलेले मृगजळासारखा हा फसवा अर्थसंकल्प आहे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com