Pimpri Chinchwad Politics : रोहित पवारांनी उद्योगनगरीत लक्ष घालताच गणेश मंडळांना अजितदादांच्या मॅरेथॉन भेटी !

Ajit Pawar Vs Rohit Pawar : दोन पवार चुलता-पुतण्याचा उद्योगनगरीत दौरा होत आहे.
Pimpri Chinchwad Politics :
Pimpri Chinchwad Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : केंद्रासह राज्यातील बडे नेते पुण्या-मुंबईतील मानाच्या प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनाला सध्या येत आहेत. त्यानुसार काल (ता.२३) रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवारांनी पिंपरी-चिंचवडमधील अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लगेच आज (ता. २४) सकाळपासून उद्योगनगरीत मंडळांना गणेश दर्शन सुरू केले असून, रात्रीपर्यंत ते चालणार आहे. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad Politics :
Nagaland NCP MLA Meet Mumbai : नागालँडमधील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईत येणार; पण कारण काय ?

गणेश मंडळभेटी आणि गणपती दर्शन हे निमित्त असले, तरी चुलते-पुतणे पवारांना आपल्या पक्षाची नव्याने मजबूत बांधणी आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये करायची आहे. अजित पवारांना प्रिय असलेल्या व २०१७ पर्यंत त्यांची निरंकुश सत्ता असलेल्या उद्योगनगरीची जबाबदारी शरद पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपले नातू रोहित पवारांकडे नुकतीच दिली. त्यातून त्यांनी १८ तारखेला जंगी एन्ट्री शहरात मारली. झंझावाती दौरा केला. त्यानंतर सहा दिवसांत काल रात्री ते पुन्हा शहरात गणेशोत्सवानिमित्त आले. अनेक गणेश मंडळांना रात्री उशिरापर्यंत त्यांनी भेटी दिल्या. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

रोहित पवारांचा पिंपरी दौरा संपत नाही, तोच अजित पवार हे आज सकाळी पिंपरीत दाखल झाले. नऊ वाजता त्यांचा दौरा एसआरए प्रकल्पाच्या भेटीने सुरू झाला. दहा वाजता मोरया गोसावीचे दर्शन घेऊन त्यांनी गणेश मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. रात्री नऊपर्यंत ते चालणार आहे. त्यात ते चाळीस गणेश मंडळांना भेट देणार आहेत. त्यातील बहुतांश मंडळे ही त्यांच्या पक्षाशी संबंधित पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीच आहेत. एक हॉटेल आणि एका पेट्रोल पंपाचेही उद्घाटन ते या दौऱ्यात करणार आहेत.

Pimpri Chinchwad Politics :
Sharad Pawar On Patel : 'महत्त्वाची पदे देऊनही..' ; शरद पवारांनी पटेलांबाबत केली नाराजी व्यक्त ?

रात्री माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील घरी जेवण केल्यानंतरच त्यांचा हा गणेश मंडळ भेट दौरा संपणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी आपल्या गटाला शहराला नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला असून, रोहित पवार हेही आपला पक्ष ताकदीने उभा करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यातून २४ तासांच्या आत दोन पवार चुलता-पुतण्याचा उद्योगनगरीत दौरा होत आहे. ताे पुढे वाढतच जाणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com