Sharad Pawar Prafil Patel
Sharad Pawar Prafil PatelSarkarnama

Sharad Pawar On Patel : 'महत्त्वाची पदे देऊनही..' ; शरद पवारांनी पटेलांबाबत केली नाराजी व्यक्त ?

Sharad Pawar On NCP Crisis : 'उद्योगपती गौतम अदानी यांच्या एका कंपनीच्या उद्घाटनासाठी....'
Published on

Gujrat News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार गटात गेलेले प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील महत्त्वाची पदे देऊनही पटेल यांनी अजित पवारांना समर्थन दिल्याने त्यांच्याबद्दल नाराज असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवारांनी गुजरातमधील पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर ही नाराजी बोलून दाखवली, अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनेने दिली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार यांनी काल शनिवारी ( दि. २३ सप्टेंबर) गुजरातेतील अहमदाबाद इथे, देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्या एका कंपनीच्या उद्घाटनासाठी उपस्थिती दर्शवली. या वेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार - अदानी भेटीवर रोहित पवारांचे भाष्य

उद्योगपती अंबानी, अदानींसह छोट्या व्यावसायिकांना शरद पवार हे नेहमी भेटत असतात. या सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्याला राज्याचा आणि देशाचा विकास कसा करता येईल, याबाबत चर्चा होत असते. त्यावरून आपण ध्येयधोरणे ठरवित असतो. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय धोरणांची आखणी कधीही करता येत नाही," असे रोहित पवार म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com