
Anjali Damania Vs Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनामची मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्याकडून केली जात होती. तब्बेतीचे कारण देत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे पुरावे नसताना उगाच हवेत तरी मारण्यात काहीही अर्थ नाही, असे म्हटले होते.
फडणवीसांच्या वक्तव्यावर अंजली दमानिया यांनी ट्विट करत चॅलेंज दिले आहे. त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गृहमंत्री फडणवीसांची हिम्मत असेल तर धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे यांचे रिकव्हर्ड व्हॉट्सअप चॅट आणि सीडीआर आम्हाला दाखवावे.
अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बालाजी तांदळे आणि शिवलिंग मोराळे यांना अटक सोडा त्यांची चौकशी देखील केली जात नाही. कारण त्यांचे फोन जप्त झाले तर पितळ उघडे पडेल, असे देखील म्हटले आहे.
दमानिया यांनी ट्विट करत सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. त्यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, विश्वास कोणावर ठेवायचा ? नारायण राणे म्हणतात नोकराने सुशांत सिंहच्या हत्येचा व्हिडिओ केला आहे. वेळ आल्यावर पुरावे सादर करेन. मग अजून सादर का नाही केले पुरावे, असा प्रश्न पडतो. पाच वर्ष झाली या प्रकरणाला. केव्हा येणार यांची ‘वेळ’ ? का हे भाजपचे केवळ दबावतंत्र आहे ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंच्या विरोधात काय कारवाई करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले होते की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधात आता देखील कोणताही पुरावा आणून दिला तर त्यांची चौकशी करण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची तयारी आहे. पुरावे नसताना उगाच हवेत तरी मारण्यात काहीही अर्थ नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.