Shankar Jagtap, Ashwini Jagtap
Shankar Jagtap, Ashwini Jagtap Assembly Election TussleSarkarnama

Video Assembly Elections : चिंचवडवर दावा करणाऱ्या दीरास अश्विनी जगतापांचं सडेतोड उत्तर...

Assembly Election Maharashtra Pimpri Chinchwad Politics : दीर शंकर जगताप आणि भावजय अश्विनी जगताप यांच्यात कलगीतुरा रंगून भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on

Chinchwad Assembly Politics : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीस काही महिने बाकी असतानाच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत वादळाची स्थिती निर्माण झाली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात कोण लढणार, दीर की भावजय यावरून भाजपातच पहिली ठिणगी पडली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दावा ठोकल्यानंतर आमदार अश्विनी जगताप यांनीही सडेतोड उत्तर देत आपणच उमेदवार असणार, असे बाजावून सांगितले.

लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत आणि इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शंकर जगताप Shankar Jagtap यांनी व्यक्त केलेली इच्छा हा त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र चिंचवड विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांची खरी वारसदार मीच आहे. आमदार म्हणून केलेली कामांमुळे पक्ष मलाच उमेदवारी देईल. तसेच पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असा दावा अश्विनी जगताप यांनी केला आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगातप यांच्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप Ashwini Jagtap आमदार झाल्या. आता ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत लागणार आहे. तत्पुर्वी मावळ लोकसभेतून महायुतीच्या उमेदवारासाठी चिंचवडमधून मोठे मताधिक्य मिळाले. याचा श्रेय घेत शंकर जगताप यांनी विधानसभेवर दावा केला आहे. मात्र माजी आमदार लक्ष्मण जगतापांची खरी वारसदार मीच असल्याचे सांगून अश्विनी जगतापांनी आपणही रिंगणात असल्याची जाणीव करून दिली. यामुळे दीर शंकर जगताप आणि भावजय अश्विनी जगताप यांच्यात कलगीतुरा रंगून भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shankar Jagtap, Ashwini Jagtap
Shankar Jagtap News : आधी नाराजी, आता थेट दावाच; चिंचवडच्या उमेदवारीवरुन जगताप कुटुंबात वादाची ठिणगी?

चिंचवड विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आहेत. मात्र महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही चिंचवडवर दावा केला आहे. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगतापानांही आपण आता विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. यावर भाजप कसा तोडगा काढणार, की चिंडवडमध्येही वेगळा राजकीय प्रयोग होणार, हेच आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shankar Jagtap, Ashwini Jagtap
Pimpri-Chinchwad : आतापर्यंत राज्यात न मिळालेलं मंत्रीपद पिंपरी-चिंचवडला यंदा थेट केंद्रात मिळण्याची संधी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com