Shankar Jagtap - Ashwini Jagtap
Shankar Jagtap - Ashwini Jagtap Sarkarnama

Shankar Jagtap News : आधी नाराजी, आता थेट दावाच; चिंचवडच्या उमेदवारीवरुन जगताप कुटुंबात वादाची ठिणगी?

Chinchwad Assembly Constituency : सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी तिथे आमदार आहे.पण याच जागेवर आता अश्विनी जगताप यांचे दीर आणि भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे.

Pimpri Chinchwad News : भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्या निवडूनही आल्या.कसब्यात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवून महायुतीला पराभवाचा धक्का दिल्यानंतर अश्विनी जगतापांनी विजय मिळवत चिंचवडचा गड कायम राखला होता.

त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल काटे यांचा पराभव केला होता.पण त्यावेळी अश्विनी जगतापांच्या उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा होती.पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा चिंचवडच्या उमेदवारीवरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे.

सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे आहे.दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी तिथे आमदार आहे.पण याच जागेवर आता अश्विनी जगताप यांचे दीर आणि भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे.

त्यांनी काहीही झालं तरी मी चिंचवड विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.जगताप कुटुंबातच उमेदवारीवरुन संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Shankar Jagtap - Ashwini Jagtap
Rohit Pawar On Ajit Pawar : भाजपनेच अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू कमी केली, रोहित पवारांचं 'ते' ट्विट चर्चेत

शंकर जगताप काय म्हणाले..?

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप हे विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. चिंचवडमधून विधानसभा निवडणुकीत वहिनी अश्विनी जगताप(Ashwini Jagtap) रिंगणात असल्यावरही तुम्ही लढणार का यावर हे येणारा काळ ठरवेल.पण मी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा दावा त्यांनी शंकर जगताप यांनी केला आहे.

जगताप म्हणाले,लोकसभेच्या निकाल आणि सध्याची भाजपची वाढलेली ताकद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवडसह पिंपरीच्या जागेचीही आम्ही मागणी करणार आहोत. महायुतीत भोसरी आणि चिंचवड विधानसभा इतर कुणा पक्षाला सोडण्याचा प्रश्न येतच नाही असेही त्यांनी सांगितले.

Shankar Jagtap - Ashwini Jagtap
Manoj Jarange Patil : ठाकरेंच्या खासदाराचा जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा, थेट राज्यपालांनाच लिहिलं पत्र

लोकसभेतली महायुती विधानसभेतही राहणार आहे.त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यात पूर्वी खासदार होते त्याच पक्षाला लोकसभेला तिकिट दिले.आता तोच फॉर्म्युला विधानसभेला असणार आहे. मतदारसंघात ज्या पक्षाचे आमदार, त्याच पक्षाला ती जागा सोडण्यात येणार आहे असा दावाही शंकर जगताप यांनी केला आहे.

शंकर जगताप याआधीही नाराज..?

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गायब झालेले शंकर जगताप तब्बल आठ तासांनी समोर आले होते. यावेळी ते अश्विनी जगतापांच्या उमेदवारी नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.पण त्यांनी मी वैयक्तिक कामानिमित्ताने लोणावळ्याला गेलो होतो, अश्विनी जगताप यांच्या प्रचारात सक्रिय भूमिका घेणार असं जाहीर केले होते.

शंकर जगताप कोण आहेत..?

भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाची धुरा सध्या शंकर पांडुरंग जगताप यांच्या खांद्यावर आहे.त्यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली होती.पण महापालिका निवडणुका झाल्याच नाहीत.

मात्र, त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. ते पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Shankar Jagtap - Ashwini Jagtap
Omraje Nimbalkar: महिला मराठा आंदोलकांनी जालन्यात ओमराजेंची गाडी अडवली; म्हणाल्या,संसदेत फक्त प्रश्न मांडू नका तर...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com