MLA Disqualification News : ठाकरे गटातील आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीसा कशाच्या आधारे पाठवल्या... सरोदेंचा सवाल

Asim Sarode News : विधानसभा अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीपच मानावा...
Rahul Narvekar, Asim Sarode News
Rahul Narvekar, Asim Sarode NewsSarkarnama
Published on
Updated on

Rahul Narwekar News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर वकील असीम सरोदे (Asim Sarode) काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

या संदर्भात असीम सरोदे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे 16 आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर आमदारांना अपात्रतेच्या नोटिसनुसार कारणे/स्पष्टीकरणे द्या, असे आदेश नार्वेकर यांनी विधानसभा सचिवांच्या मार्फत देणे समजण्यासारखे आहे.''

Rahul Narvekar, Asim Sarode News
Solapur Politic's : अजित पवारांना धक्का; शहराध्यक्ष अवघ्या आठ दिवसांत शरद पवार गटात सामील

''मात्र, उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेतील आमदारांना अपात्रतेची कारवाई का करू नये याचे स्पष्टीकरण/कारणे दाखवा नोटिसेस नार्वेकर यांनी कशाच्या आधारे पाठवल्यात याबाबत जाणून घेण्याची कायदेशीर-उत्सुकता मला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या 141 पानांच्या निकालात २०६ ड, या परिच्छेदामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे, की विधीमंडळ पक्ष प्रतोद नेमु शकत नाही. प्रतोद नेमण्याचा अधिकार मूळ राजकीय पक्षालाच आहे.''

''विधानसभा अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीपच मानावा. 156 व्या परिच्छेदात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की अपात्रते बाबत प्रक्रिया करतांना निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा कोणताही संदर्भ विधानसभा अध्यक्षांनी घेऊ नये, म्हणजेच शिवसेना कोणाची या बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा कोणताही प्रभाव न ठेवता नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे.''

Rahul Narvekar, Asim Sarode News
MLA Disqualification Decision: 'सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरतील; पण अंतिम निर्णय अध्यक्षांचा'

''सर्वोच्च न्यायालयाने 123 व्या परिच्छेदात सांगितले आहे की एकनाथ शिंदे यांना विधिमंडळचा लिडर म्हणून मान्यता देण्याचा राहुल नार्वेकर यांचा निर्णय बेकायदेशीर होता. 119 व्या परिच्छेद स्पष्ट केले आहे की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाचा प्रतोद म्हणून मान्यता दिली. तो निर्णय बेकायदेशीर होता.''

''याचाच अर्थ भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मूळ शिवसेना (Shiv Sena) पक्षातील आमदारांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील विधानसभा अध्यक्षांकडे दिलेला प्रस्ताव सुद्धा बेकायदेशीर आहे. 2 दिवसांपुर्वी विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेतील आमदारांच्या नावाने अपात्रते संदर्भात काढलेल्या कारणे दाखवा नोटीस बेकायदेशीर व घटनाबाह्य आहेत,'' असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com