Narhari Zirwal News : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी प्रथा जपत वूध-वरांना केला रोख आहेर....

आहेराला मिळालेल्या कपड्याचा घरात तसाच ढीग पडून राहायचा.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Pargaon (Pune) : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे त्यांच्या साध्या राहणीमानाने नेहमीच चर्चेत असतात. ते आपल्या रूढी, परंपरा व संस्कृतीही कायम जपतात, याचा प्रत्यय आज आंबेगावकरांना आला. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील पशुवैद्यक डॉ. शांताराम गावडे यांचा मुलगा ऋषिकेश याच्या विवाहासाठी झिरवळ हे आज (रविवारी, ता ११ जून) मेंगडेवाडी येथे आले होते. वधू-वरांना शुभेच्छा देऊन परत जाताना नवदांपत्याच्या हातात प्रत्येकी एक हजार रुपये ठेवत ‘ही आमच्या भागात आहेर करण्याची प्रथा आहे, त्यामुळे मान समजून ठेवून घ्या,’ असेही सांगितले. झिरवळ यांच्या साधेपणाची एकच चर्चा तालुक्यात होत आहे. (Assembly Deputy Speaker Narhari Zirwal kept the custom and gave cash to bride and groom..)

निरगुडसर येथील डॉ. गावडे यांचा पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्या माध्यमातून १७ वर्षापूर्वी नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याशी संबध आला होता. गावडे यांनी त्यांना अनेकदा निरगुडसर येथे घरी येण्याचा आग्रह केला होता. डॉ. गावडे यांचा मुलगा ऋषिकेश आणि सुरेश मेंगडे यांची मुलगी अर्चना यांच्या विवाहासाठी झिरवळ यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. निवेदकानेही झिरवळ यांच्या साध्या राहणीमानाचे अनेक किस्से सांगितले

Narhari Zirwal
Solapur Politic's : मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक, राष्ट्रवादी नेत्याच्या घरी विखे पाटलांची भेट; मोहिते पाटील, सातपुते मैदानावरच रेंगाळले

झिरवळ हे वधू-वरांना शुभेच्छा देताना म्हणाले की, डॉ. गावडे हे मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पाच तासांचा प्रवास करून माझा घरी आले होते. आज माझ्या मतदारसंघात अनेक लग्न असूनही मी या विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिलो आहे.

Narhari Zirwal
Solapur Shivsena Leader warn BJP : ‘त्या’ लोकांना ताकद देणार असाल तर भाजपने आमच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये; शिंदे गटाच्या नेत्याने सुनावले

शुभेच्छा देऊन झाल्यावर जाताना त्यांनी ऋषिकेश व अर्चना यांच्या हातात प्रत्येकी एक हजार रुपये दिले आणि म्हणाले, आमच्या आदिवासी समाजात पूर्वी पैसे नसायचे म्हणून लग्नात कपडे, साड्या, भांडी आहेर दिले जायचे. आहेराला मिळालेल्या कपड्याचा घरात तसाच ढीग पडून राहायचा.

Narhari Zirwal
Dilip Mohite Vs Adhalrao : आगामी लोकसभेचे तिकिट आढळरावांनाच भेटू दे रे देवा; राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंनी अशी प्रार्थना का केली

कालांतराने पैशाच्या आहेराची प्रथा सुरु झाली, जो तो ऐपतीप्रमाणे अगदी ११ रुपयांपासून आहेर करू लागला. आहेरातून जमा झालेल्या रकमेतून त्या कुटुंबाला काहींसा हातभार लागत होता, त्यामागे भावना, प्रेम आपुलकी असायची, त्यामुळे हा आहेर मान म्हणून ठेवून घेण्याचा आग्रह केला. प्रथा परंपरा जपण्याच्या झिरवळ यांच्या प्रयत्नाचे उपस्थितांना मोठे कुतूहल वाटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com