Dilip Mohite Vs Adhalrao : आगामी लोकसभेचे तिकिट आढळरावांनाच भेटू दे रे देवा; राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंनी अशी प्रार्थना का केली

आढळराव यांनी खेड तालुक्याचा विकास केला नाही तर तालुका भकास केला आहे
Shivajirao Adhalrao Patil -MLA Dilip Mohite
Shivajirao Adhalrao Patil -MLA Dilip MohiteSarkarnama
Published on
Updated on

Khed News : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आता जनमतात स्थान राहिलेले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे तिकीट आढळरावांनाच मिळू दे, अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव यांच्यावर केली. (Only Shivajirao Adhalrao Patil should get the ticket for upcoming Lok Sabha elections : MLA Dilip Mohite)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) २४ वा वर्धापनदिन खेड तालुका पक्षाच्या वतीने बाजार समितीच्या सभागृहात साजरा करण्यात आला. या वेळी आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्या वेळी त्यांनी आढळरावांवर उपरोधिक टीका केली.

Shivajirao Adhalrao Patil -MLA Dilip Mohite
Solapur Shivsena Leader warn BJP : ‘त्या’ लोकांना ताकद देणार असाल तर भाजपने आमच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये; शिंदे गटाच्या नेत्याने सुनावले

ते म्हणाले की, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (shivajirao Adhalrao Patil) यांच्या विचारांचा एकही माणूस निवडून आला नाही. त्यांच्या जिल्हाध्यक्षाचाही पराभव झाला. आंबेगाव तालुक्यातही बाजार समितीत त्यांची वाताहात झाली. एकंदरीत त्यांना आता जनमतात स्थान राहिलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीचे तिकीट त्यांनाच मिळू दे.

Shivajirao Adhalrao Patil -MLA Dilip Mohite
Solapur BJP MLA : भाजप आमदार म्हणाले, ‘लोकं म्हणतात दारुविक्रीत माझा हात... ’ ; भरसभेतून लावला APIला फोन

शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामुळे खेड तालुक्याची प्रशासकीय इमारत झाली नाही, त्यामुळे तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. आढळराव यांनी खेड तालुक्याचा विकास केला नाही तर तालुका भकास केला आहे. त्यांनी सत्तेच्या जोरावर प्रशासकीय इमारतीसाठी २३ कोटी रुपये मंजूर असताना त्या कामाची प्रक्रिया थांबवून त्याठिकाणी पंचायत समितीच्या इमारतीचे काम सुरू केले, असा घाणाघाती आरोपही मोहिते यांनी केला.

Shivajirao Adhalrao Patil -MLA Dilip Mohite
BJP HighCommand suggestion to shinde : मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘त्या’ पाच मंत्र्यांना वगळा;भाजप हायकमांडच्या सूचनेने मुख्यमंत्री पेचात

ते म्हणाले की, खेड तालुक्यातील सरकारी कार्यालयांची अवस्था वाईट आहे. लोकांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागते. प्रशासकीय इमारतीच्या कामात यांनी खोडा घातल्याने तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे.'

या वेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरूण चांभारे, खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, महिला तालुका अध्यक्षा संध्या जाधव, निर्मला पानसरे, अनिल राक्षे, हिरामण सातकर आदी उपस्थित होते. उमेश गाडे यांनी सूत्रसंचालन केले. जयसिंग दरेकर यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com