Ravindra Dhangeka shahaji patil
Ravindra Dhangeka shahaji patilsarkarnama

Ravindra Dhangekar : पोलिसांनी पाच कोटी पकडले, रवींद्र धंगेकर गंभीर आरोप करत म्हणाले, 'त्या' गाडीत शहाजीबापुंची माणसं

khed shivapur toll 5 crore recovered: रवींद्र धंगेकर म्हणाले, शिवापूर टोल नाक्यावर जी गाडी पकडण्यात अली त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची माणसं होती.
Published on

Pune News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना खेड शिवापूर टोलनाका येथे एका गाडीमध्ये तपासणी दरम्यान पाच कोटी सापडल्याचे निष्पन्न झाले आहे. हे 5 कोटी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदाराचे असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. आता या प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

'महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडे करोड रुपये पोहोचवले जात आहेत. शिवापूर टोलनाक्यावर पैसे सापडल्याची घटना समोर आली मात्र अनेकदा पोलिस बंदोबस्तामध्ये हे पैसे पोहोचवले जातात. एसीपी, डीसीपी या पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यात देखील पैसे पोहोचवले जातात', असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले, सध्या सर्व निवडणूक यंत्रणा भाजपने हायजॅक केल्या आहेत. शिवापूर टोल नाक्यावर जी गाडी पकडण्यात अली त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची माणसं होती. सुरुवातीला गाडीतून 15 कोटी सापडल्याचा समोर आलं होतं. मात्र त्या पंधरा कोटींचे पाच कोटी कधी झाले हे समजलंच नाही.

Ravindra Dhangeka shahaji patil
Heena Gavit: लोकसभेतील पराभवाचा वचपा विधानसभेत काढणार; माजी खासदाराचा प्रचार सुरु

हे पैसे नेमके कोणाचे आहेत, याची चौकशी करण्यात आली नाही. नंतर त्या गाडीच्या चालकाने हे पैसे शहाजी बापूंचे असल्याचे सांगितल्यानंतर देखील ते पैसे ताब्यात घेण्यात आले नाही. कोणतीही तक्रार अथवा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आचारसंहिता भंग होऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, असे देखील धंगेकर म्हणाले.

पोलिसांवर कारवाई करा

सिस्टीम मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून या यंत्रणेचा वापर केला जात आहे. अशा पद्धतीने जर पैसे पकडले गेले तरी ते घर पर्यंत पोहोचवण्याचं काम हे पोलिसांनी केला आहे. हे पैसे जप्त न करता कोणत्याही कारवाई न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे देखील धंगेकर यांनी सांगितलं.

तसेच एकीकडे माझ्यावर दिवाळी सरंजाम वाटत असल्याचा खोटा गुन्हा दाखल केला गेला. दुसरीकडे आमदारांचे पकडलेले पैसे पोलिसांनी घरपोच पोचवले त्यामुळे या यंत्रणांचा उपयोग विरोधकांना त्रास देण्यासाठीच होत असल्याचा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Ravindra Dhangeka shahaji patil
Political Horoscope BJP : उमेदवारीसाठी भाजपने का निवडला 28 ऑक्टोबरचा मुहूर्त?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com