Nawab Malik: ज्योतिषगिरी बंद करा आणि निवडणुकांकडे लक्ष द्या'; नवाब मलिकांना भाजपचा सल्ला

Pravin Darekar criticized NCP leader Nawab Malik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातील संपर्कावर भाष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना भाजपने दिला खोचक सल्ला.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्या संपर्कात असून निवडणुकीनंतर काही होऊ शकतं, असा दावा मलिक यांनी केला आहे.

यानंतर मलिकांना भाजपने ज्योतिषगिरी सोडून निवडणुकीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, "खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे सकाळी येऊन गरळ ओकत आहेत. आता ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार असल्याचं सांगत आहेत. परंतु आम्ही याबाबत यापूर्वीच सकारात्मक निर्णय घेतला आहे. आघाडी नेत्यांना केवळ विशिष्ट लोकांचे लांगूलचालन पाहिजे आहे".

केवळ हातात संविधान घेऊन नौटंकी करण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहे. त्यांनी संविधान मेळावा घेण्यापेक्षा अंतःकरणात संविधान हवे, याकडे लक्ष्य द्यावे. भाजपने नेहमी संविधान सन्मान करून त्याचे रक्षण केले. लोक आता सजग झाले असून ते आता महायुतीसोबत राहतील. राज्याचे उज्वल भविष्यासाठी युती काम करत असून आघाडी सरकार हे स्थगिती सरकार होते हे लोकांनी पाहिले, असा टोला देखील प्रवीण दरेकर यांनी लगावला.

Nawab Malik
Sharad Pawar: आता कुठे तरी थांबायला पाहिजे ! शरद पवार यांचे संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत VIDEO पाहा

महायुतीचे सरकार असेल

नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले, "नवाब मलिक यांनी ज्योतिषाचा धंदा करण्यापेक्षा निवडणुकांमध्ये लक्ष केंद्रित करावे. नवाब मलिक म्हणता येत तसं काही होणार नाही. निवडणुकानंतर अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप, असं एकत्रित महायुतीचे सरकार असेल". निवडणुकांमध्ये काही नेते आपल्या सोयीने स्टेटमेंट देत असतात, त्याच प्रकारचं हे स्टेटमेंट नवाब मलिक यांचा असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.

Nawab Malik
Sharad Pawar : उचकवा उचकवी करण्यात शरद पवारांचा कोणी हात धरू शकत नाही; अजितदादांवरील टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर

मलिक यांचा प्रचार सहभागावर टिप्पणी

दरेकर पुढे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असून कोणताही कार्यकर्ता नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. त्या ठिकाणी महायुतीचा अधिकृत उमेदवार असून भाजप त्याच उमेदवाराचा प्रचार करेल.

नवाब मलिक यांना अधिकृत 'एबी'फॉर्म न देण्याचा निर्णय झाला होता. मात्र शेवटच्या क्षणी अजित पवारांच्या पक्षांतर्गत निर्णयानंतर त्यांना 'एबी' फॉर्म देण्यात आला". राज्यातील चार पाच जागांवर, असा निर्णय झाला आहे. एखादे जागेसाठी महायुतीची जी मोट बांधली आहे, तिला बाधा पोचू नये म्हणून भाजपने समजूतीची भूमिका घेतल्याचे देखील दरेकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com