Sharad Pawar : उचकवा उचकवी करण्यात शरद पवारांचा कोणी हात धरू शकत नाही; अजितदादांवरील टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर

Pravin Darekar Criticism Sharad Pawar and Supriya Sule: अजित पवार यांच्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी टीका करताच, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अजितदादांसाठी मैदानात उतरत दिले जोरदार प्रत्युत्तर.
Sharad pawar
sharad pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : "दुर्दैवाने महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला सातत्याने गैरहजर राहिले. त्यामुळे महाराष्ट्राची ‘जीएसटी’ बाबतची भूमिका मांडली जात नाही”, अशा शब्दात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याच्या कारभारावर निशाणा साधला.

महायुतीमधील मित्रपक्ष अजित पवारांवर टीका होताच, आता भाजप नेते प्रवीण दरेकर मैदानात उतरत, त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, "महाविकास आघाडी (MVA) फसवी आश्वासन देण्यात आघाडीवर आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत सातबारा मोकळा करणे, कर्जमाफी सारख्या घोषणा केल्या. मात्र कोणतेही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे लोकसभेला जे फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं, त्याबाबत आता जनता सुज्ञ झाली आहे. त्यामुळे जनता आगामी निवडणुकात फेक नॅरेटिव्ह तयार करणाऱ्यांना जागा दाखवेल, असाही विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

Sharad pawar
RPI Pune News: भाजपच्या मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच घेतली महायुतीला मतदान न करण्याची शपथ!

राज्य सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार आल्यानंतर या योजनेतील हप्ता वाढून देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. मात्र याबाबत महाविकास आघाडी दुटप्पी भूमिका घेताना पहिला मिळाली. ही योजना बंद करण्यासाठी एकीकडे ते कोर्टात जातात, तर दुसरीकडे आपलं सरकार आले, तरी ही योजना सुरू राहणार असल्याचे सांगतात. योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारकडे निधी नाही, असंही सांगतात. मात्र दुसरीकडे आमचं सरकार आल्यास हप्ता वाढून देण्याची वल्गना करतात, याकडे प्रवीण दरेकर यांनी लक्ष वेधले.

Sharad pawar
Mauli Khandagale : जुन्नर मधून ठाकरे गटाची तलवार अखेर म्यान; तालुकाप्रमुख खंडागळेंची माघार

अजितदादांची अशी घेतली बाजू

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीवरून शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्याबाबत विचारला असता दरेकर म्हणाले, "जेष्ठ नेते शरद पवार खोट्या गोष्टी सातत्याने मांडत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली उध्दव ठाकरे यांचे सरकार असताना जीएसटी बैठकीत व्यापारी अडचणी मांडू शकले नाही. अजित पवार केवळ दोन बैठकीस गेले नाही. परंतु इतर सर्व जीएसटी बैठकींना ते हजर राहिले आहे".

पवार नॅरेटिव्हच्या शोधात

निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना कुठलातरी नॅरेटिव्ह सेट करायचा आहे. त्यांच्या हातात काही येताना दिसत नसल्याने जीएसटीच्या माध्यमातून उचकवता येतय का? हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उचकवा उचकवी करण्यात त्यांचा राज्यात आणि राजकारणात कोणी हात धरू शकत नाही. त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचे टीका दरेकर यांनी केली.

बारातमीच्या युवा नेतृत्वावरून टीका

दरेकर यांनी "बारामतीमध्ये पुढील पिढीचे नेतृत्व पाहिजे, असे शरद पवार सांगून योगेंद्र पवार यांचे नेतृत्व पुढील तीस वर्षाकरिता सांगत आहेत. मात्र मग बाकीच्या युवा पिढीने केवळ त्यांचे झेंडे वाहण्याचे काम करावयाचे का?" असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com