Rohit Pawar News : आमदार रोहित पवारांचं पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न ? 'सीसीटीव्ही'त धक्कादायक माहिती समोर

Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं हडपसर परिसरातील सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune : अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.15) रात्री घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कर्जत - जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं हडपसर परिसरातील सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. त्यांचे कार्यालय असलेल्या बिल्डिंगमध्ये शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी हडपसर(Hadpasar) पोलीस ठाण्यात तकार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rohit Pawar
Rohit Pawar : ट्रक चालक ठाण्याचा की ट्रकचा चेसी बारामतीचा.. ; रोहित पवारांनी शिंदे-फडणवीसांना हिणवले

हडपसर येथील आमदार रोहित पवारां(Rohit Pawar) च्या कार्यालयात शनिवारी (दि.१५) रात्री तीन व्यक्ती येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. अज्ञातांकडून पवार यांच्या पार्किंगमध्ये असलेली सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील करण्यात आली आहे. रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आल्याची माहिती आहे.

शेजारीच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न का केला असे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे आमदार रोहित पवार यांचे कार्यालय ज्या बिल्डिंगमध्ये आहे, त्या ठिकाणी असलेल्या वॉचमनची सायकल जाळण्याचा प्रकार घडला. वॉचमनचे आणि आरोपींचे वैयक्तिक वादामुळे हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेत रोहित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आतील बाजूस आणि बाहेरील बाजूस काहीही झालेलं नाही असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.

Rohit Pawar
Jayant Patil On Opposition Leader: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे? जयंत पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या आत किंवा बाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. रोहित पवार यांच्या कार्यालयातील वॉचमनची सायकल जाळल्याच्या प्रकरणावरून ते स्पष्टीकरण दिले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com