Laxman Hake : लक्ष्मण हाकेंवर पुरंदरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न; ‘चहा पित असताना शिवीगाळ करत माझ्या अंगावर धावून आले...’

Attack Attempted At Purandar Taluka : त्यांनी दहा जणांनी त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला,
Laxman Hake
Laxman Hake Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 31 August : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आरक्षणामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण तापताना दिसत आहे. विशेषतः ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून शाब्दीक चकमक होताना दिसत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज (ता. 31 ऑगस्ट) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पुरंदर तालुक्यातील नीरा येथे त्यांच्या हल्ल्या करण्याचा प्रयत्न झाला. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःची दिली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, माझा आज सातारा जिल्ह्यातील लोणंद शहरात नियोजित दौरा होता. काही उद्‌घाटने आणि गणपती उत्सवाच्या आरत्या होत्या. त्यानिमित्ताने पुण्यातून निघाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा या गावी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो.

ते म्हणाले, चहा प्यायला थांबल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा भ्याड लोक दुचाकीवरून माझ्याकडे आले. त्यांच्या दुचाकींना झेंडे लावण्यात आलेले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिल्या. घोषणा देऊन माझा निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

मला शिवीगाळ करत माझ्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी दहा जणांनी त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, माझ्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे हाके यांनी नमूद केले.

Laxman Hake
Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; ‘ते तर मराठा समाजाला लागलेला कलंक, मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी समाजाशी गद्दारी करू नका’

ते म्हणाले, माझ्याबरोबर पुणे शहर, सातारा आणि पुणे ग्रामीणचे पोलिस कर्मचारी हेाते. या पोलिस कर्मचाऱ्यांनी माझी त्यांच्या तावडीमधून सुटका केली आणि त्यांनी मला गाडीत आणून बसवलं. हा माझ्यावर भ्याड पद्धतीचा हल्ला आहे.

Laxman Hake
Mohite Patil Meets Jarange : धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; मराठा आरक्षणासंदर्भात केले मोठे विधान, म्हणाले, ‘वेळप्रसंगी घटनादुरुस्ती....’

आम्ही कोणाच्याही ताटातील मागत नाही. आम्ही कोणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही. आमचं आरक्षण टिकलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आज महाराष्ट्रात फिरत असताना अशा पद्धतीच्या झुंडशाहीला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे की, आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आपण सावध झालं पाहिजे, असेही आवाहन लक्ष्मण हाकेंनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com