Ayush Komkar Murder Case : मामाच्या हत्येचा बदला भाच्याच्या हत्येने; नव्या पुण्याचे शिल्पकार कुठे आहेत? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar deendra Fadnavis Ajit Pawar : गणेशविसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या आयुष कोमकरच्या हत्येवरून आमदार रोहित पवार यांनी नव्या पुण्याचे शिल्पकार कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे.
Vanraj Andekar .jpg
Vanraj Andekar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : पुण्यात नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष होत असताना या हत्येतील प्रमुख संशयीचा मुलगा आयुष कोमकर याची शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरचा भाचाच होता. कोमकर आणि आंदेकर गँगमध्ये भडकलेल्या या वादामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आयुषच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या नाकावर टीच्चून पुण्यात रक्तरंजित होळी खेळली जाते.. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय… अशा परिस्थितीत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ कुठेयत असा सवाल लोक सवाल करत असल्याचे म्हटले आहे.

नव्या पुण्याचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जाते तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार हेच नव्या पुण्याचे शिल्पकार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे रोहित पवार यांचा निशाण्यावर नेमके फडणवीस की अजित पवार हे कळू शकले नाही. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले नाहीत.

Vanraj Andekar .jpg
Ganpati Visarjan Accident : गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देतांना पुण्यातील दोघांवर काळाचा घाला तर इतर दोघे अद्याप बेपत्ता

बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल

शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत गोळीबार करून गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर याची हत्या करण्यात आली. या हत्येकमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vanraj Andekar .jpg
Devendra Fadnavis Politics : ठाण्यात 'देवाभाऊ'ची बॅनरबाजी, मराठा आरक्षणावर श्रेयवादाची लढाई? फडणवीसांच्या आमदाराचा स्पष्ट संदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com