Ganpati Visarjan Accident : राज्यसह देशभरात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. यासाठी आकर्षक विसर्जन मिरवणुका विविध गणेश मंडळांकडून काढण्यात आल्या. मात्र, काही ठिकाणी या उत्साहाला गालबोट लागलं आहे.
गणपती विसर्जन करताना पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली. गणपती विसर्जन करण्यासाठी गेले चौघे जण नदीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.
तर इतर दोघे जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे ही दुर्दैवी घटना चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाकी बुद्रुक या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या 21 आणि 27 वर्षीय तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाने नदीपात्रातून बाहेर काढले आहेत.
तर दुसरीकडे शेल पिंपळगाव येथेही विसर्जना दरम्यान, एका 45 वर्षाच्या व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू झाला. बिदरवाडी इथे एक जण विहिरीत बुडाला. 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईत साकीनाका परिसरात खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना ट्रॉलीला हाय टेन्शन वायरमधून शॉक लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झालेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.