Bachchu Kadu : राम भक्तांनी जाणकारांना फसवलं, 'गिर जाये कबूल है पर अपून नही जाना चाहिए', शेरेबाजी करत बच्चू कडूंची टीका

Bacchu Kadu targets Maharashtra government : महादेव जानकर यांना कशा पद्धतीने राम भक्तांनी फसवलं तसंच पवार साहेबांची पावर कशी कमी झाली यासारख्या अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. असं बच्चू कडू म्हणाले.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या राजकारणामध्ये एका नवीन आघाडीचा प्रयोग आगामी काळात बघायला मिळू शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहार चे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे एकत्रित येत आज पुण्यामध्ये मेळावा घेत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात प्रभावी विरोधकाच्या भूमिकेतून हे तिन्ही नेते एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे. याबाबत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, विरोधक एकत्र येण्यासाठी अजेंडा आवश्यक असतो आमचा अजेंडा गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा आहे. महादेव जानकर यांना कशा पद्धतीने राम भक्तांनी फसवलं तसंच पवार साहेबांची पावर कशी कमी झाली यासारख्या अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यामुळे आमचं अस्तित्व टिकवण्यापेक्षा सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करू असं बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu
Chhagan Bhujbal : शिवसेना सोडल्यावर १२ वर्ष कुणाशी बोललो नाही पण..; भुजबळांनी सांगितला शिवसेना फुटीचा जुना किस्सा

आमचा एकत्र येण्याचा अजेंडा हा सत्तेपर्यंत जाण्याचा नसून सत्ता गरिबांपर्यंत आणण्याचा आहे. मी राज्यमंत्री झालो तसंच महादेव जानकर हे देखील कॅबिनेट मंत्री झाले होते. मी चार वेळा स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहे. सर्व पक्ष विरोधात असताना देखील मी निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र आम्ही कुठेही झुकलो नाही मला भाजपमधून देखील तीन-चार सीट मिळाल्या असत्या तसेच पवार साहेबांनी देखील तेवढ्या सीट देऊ केल्या. मात्र त्या मी नाकारल्या "गिर जाये कबूल है पर अपून नही जाना चाहिए" हीच आपली भूमिका असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं

बच्चू कडू पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोला बोला म्हणत आहोत. मात्र मुख्यमंत्री बोलतच नाहीत त्यांची नेमकी अडचण काय आहे हे आम्हाला कळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठल्या ब्राह्मणाकडून शेतकरी कर्जमाफी वर बोलण्यासाठी मुहूर्त काढायचा आहे. हे त्यांनी सांगावं. आमचे सत्तेतील अनेकांशी चांगले संबंध आहेत मात्र आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो जो शेतकरी विरोधी तो आमच्या विरोधी आहे.मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो.

Bachchu Kadu
Suhas Kande On Sameer Bhujbal : समीर भुजबळ अजित पवारांनी हुसकलेला प्राणी, सुहास कांदेंची बोचरी टीका

सुप्रिया सुळे यांना का केला होता कॉल?

सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचा सांगितलं होतं. त्याबाबत माहिती देताना बच्चू कडू म्हणाले, परभणीत एका शेतकऱ्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली. त्या संदर्भात सुप्रिया सुळे यांना मी फोन केलेला होता. काल मी परभणीत जाऊन आलो त्या ठिकाणी शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. एकीकडे पैसे नाहीत म्हणून गर्भवतीचा मृत्यू होतो. तर एकीकडे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि त्याच्या आत्महत्या बाबत करतात त्याच्या गर्भवती पत्नीने देखील आत्महत्या केली असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.याबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील आवाज उठवावा यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com