Bala Bhegade: भेगडेंचा शेळकेंना इशारा! आरोप आठ दिवसांत सिद्ध करा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू

Bala Bhegade Warns Sunil Shelke: जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत चर्चा झाली नाही. खोटे आरोप करून आमदार शेळके आमच्यात वाद लावत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जनतेचा कौल व पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, असे गणेश भेगडे म्हणाले,
Bala Bhegade - Sunil Shelke
Bala Bhegade - Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Bala Bhegade Vs Sunil Shelke : वडगाव मावळ : ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याबाबत केलेला आरोप आठ दिवसांत सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा भाजचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत युतीचा प्रस्ताव आणि ईव्हीएमबाबत आमदार शेळके यांनी केलेले आरोप यावेळी गणेश भेगडे यांनी फेटाळून लावले. आठ दिवसांत आरोप सिद्ध करा अन्यथा अनुसानीचा दावा दाखल करण्यात येईल. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही राजकारणातून बाजूला होऊ, असे भेगडे म्हणाले.

तळेगाव नगरपरिषदेमध्ये पक्षाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता नगराध्यक्ष होणार म्हणून आम्ही युतीची तयारी दाखवली; परंतु आमदार शेळके यांनी युती धर्म पाळला नाही. यातून धडा घेत आम्ही युतीबाबत सावध भूमिका घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत चर्चा झाली नाही. खोटे आरोप करून आमदार शेळके आमच्यात वाद लावत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जनतेचा कौल व पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, असे भेगडे म्हणाले.

Bala Bhegade - Sunil Shelke
Rajya Sabha News: शरद पवार, आठवले यांना पुन्हा संधी? महाराष्ट्रातील सात खासदार होणार निवृत्त

भाजपचे निवडणूक प्रमुख बाळासाहेब नेवाळे, कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, सहकार आघाडीचे अध्यक्ष बाबूलाल गराडे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com