Madha News : मोहिते पाटील, स्थानिकांचा विरोध डावलून शरद पवार बबनदादांच्या हाती तुतारी देणार?

Babanrao Shinde Meet Sharad Pawar : मुलाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावत आहेत. मात्र, पवारांनी तीन भेटीनंतर दाद लागू दिली नव्हती. मात्र, चौथ्या भेटीवेळी ते शिंदेंना गाडीतून घेऊन फिरले.
Sharad Pawar- Vijayshinh mohite Patil-Babanrao Shinde
Sharad Pawar-Vijayshinh mohite Patil-Babanrao Shinde
Published on
Updated on

Solapur, 17 October : माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. तीन भेटीनंतर पवारांनी अखेर बबनराव शिंदे यांना आपल्या गाडीत घेऊन एकत्र प्रवास केला. मुलाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावत आहेत. मात्र, पवारांनी तीन भेटीनंतरही दाद लागू दिली नव्हती.

मात्र, चौथ्या भेटीच्या वेळी ते शिंदेंना गाडीतून घेऊन फिरले. त्यामुळे मोहिते पाटलांपासून माढ्यातील स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांचा असलेला विरोध डावलून पवार हे बबनराव शिंदे यांच्या मुलाला पक्षाची उमेदवारी देणार का, असा सवाल या भेटीनंनतर चर्चेत आला आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातून (Madha Assembly Constituency) मागील सहा निवडणुकांमध्ये आमदार बबनराव शिंदे हे सातत्याने निवडून येत आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत थांबण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. आमदार शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे माढ्यातून आगामी विधानसभेची निवडणूक लढवतील, असे खुद्द आमदार शिंदे यांनी जाहीर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत जाणे पसंत केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत विरोधात गेल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबनराव शिंदे यांनी अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी आमदार शिंदे यांनी दोनदा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली हेाती. मात्र, सुरुवातीची पवारांची भेट ही शिंदे यांना महत प्रयासाने मिळाली होती.

पहिल्या तीन भेटीनंतर शरद पवारांनी आमदार बबनराव शिंदे यांना उमेदवारी आणि पक्षात घेण्याबाबत कोणतीही अनुकूलता दर्शविली नव्हती. या सर्व घडामोडीत अजित पवार यांनी माढ्यातून शिंदे यांच्यासाठी जनसन्मान यात्रा आणि लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला रणजितसिंह शिंदे यांनी व्यासपीठावर हजेरी लावली नव्हती.

Sharad Pawar- Vijayshinh mohite Patil-Babanrao Shinde
Beed Politics : बीडमध्ये दोनच आमदारांची उमेदवारी फिक्स; महायुती आणि महाविकास आघाडीत 'राष्ट्रवादीच' वरचढ

आमदार बबनराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घेण्यात मोहिते पाटील यांनी ठाम विरोध केला आहे. याशिवाय संजय कोकाटे यांनी तर आमदार बबनराव शिंदे यांना शरद पवारांनी पक्षात घेतले तर त्याच दिवशी आम्ही पक्ष सोडणार, असे जाहीर केले आहे. संजय कोकाटे यांनी शिंदे यांच्याविरोधात मागील निवडणूक लढवत तब्बल 74 हजार मते घेतली होती.

याशिवाय बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनीही शरद पवारांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही माढ्यातून तुतारीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मुलाखत दिली आहे. माढ्यातून मोहिते पाटील कुटुंबातून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. मात्र, ती चर्चा पुढे सरकताना दिसत नाही.

Sharad Pawar- Vijayshinh mohite Patil-Babanrao Shinde
Justice Sanjiv Khanna : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी ठरले; कलम 370, निवडणूक रोख्यांसह अनेक महत्वाच्या केसचा दिलाय निकाल

दुसरीकडे, आमदार बबनराव शिंदे यांनी तुतारीचा उमेदवारीचा पिच्छा अजून सोडलेला नाही. त्यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे अगोदर शिंदेंना भेटायचे टाळणाऱ्या पवारांनी त्यांना गाडीत घेऊन एकत्र प्रवास केला. त्यामुळे मोहिते पाटील आणि माढ्यातील स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून पवार हे बबनराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणार का?, याची चर्चा पवार-शिंदेंच्या कालच्या भेटीनंतर रंगली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com