Pawar Vs Pawar : युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; अजितदादांचं लक्ष तावरे गुरू-शिष्य जोडीकडे!

Baramati News : अजित पवार यांची एकहाती सत्ता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत.
Malegao Sugar Factory
Ajit Pawar, NCPSarkarnama
Published on
Updated on

Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ताकदीने लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बारामती पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार यांनी कारखान्याचे सभासद आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

याच कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला मताधिक्य मिळावे म्हणून शर्थीने प्रयत्न केले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांची निवडणूक ही या कार्यकर्त्यांसाठी असते. त्यामुळे युगेंद्र दादा ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याबाबत आमचा आग्रह राहील अशी आक्रमक भूमिका ज्ञानदेव बुरूंगले, शरद तुपे, इंद्रसेन आटोळे या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

Malegao Sugar Factory
Suresh Dhas : 'ती' भेट गुप्त, त्यामुळे झालेले 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी आमदार धसांचे 'उघड' प्रयत्न

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे लक्ष तावरे गुरू-शिष्यांची जोडी काय करणार याकडे लागले आहे. पाच वर्षांपूर्वी अजित पवार यांनी भाजपचे माजी नेते चंद्रराव तावरे, कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांच्या हातातून हा कारखाना ताब्यात घेतला होता. आता अजित पवार भाजपसोबत आहेत.

अजित पवार हे माळेगाव कारखाना आपल्या विचाराचा राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार यात शंकाच नाही. यंदाही माळेगाव निवडणुकीकडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. सत्ताधारी संचालक मंडळ अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. संचालक मंडळातील वरिष्ठ नेते सध्याच्या घडीला संभाव्य उमेदवार निश्चिती बाबत गटनिहाय गोपनीय बैठका घेताना दिसून येत आहेत.

Malegao Sugar Factory
Chhagan Bhujbal Politics: भुजबळ यांचा जयंत पाटलांना कडक सल्ला... म्हणाले, शरद पवारांकडून काही शिका!

माळेगाव कारखाना म्हणजे अजित पवार यांचे राजकीय संस्थानचं!

माळेगाव आणि सोमेश्वर हे सहकारी तर अंबालिका आणि दौंड शुगर्स हे दोन खाजगी कारखाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नियंत्रणात आहेत. हे साखर कारखाने म्हणजे त्यांची राजकीय संस्थांनचं. आज घडीला हे चारही कारखाने उत्तम स्थितीमध्ये आहेत. साखर उतारा, इथेनॉलपासून निर्मिती, गाळप क्षमतेचा वापर अशा विविध कार्यक्षमतेवर हे कारखाने राज्यात अग्रगण्य ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com