Sunetra Pawar : "अजितदादांच्या पश्चात पहिली निवडणूक, साहेबपण आले नाहीत?"; प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी म्हणाल्या, "सगळ्याच बाजूंनी..."

Baramati By-Election Voting : अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढवत आहेत. तर आज सकाळी मतदानाला सुरूवात होताच सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विद्याप्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन केलं आणि त्यानंतर त्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati By-Election Voting : बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज (ता.23) मतदान होत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर ही निवडणूक होत आहे.

अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढवत आहेत. तर आज सकाळी मतदानाला सुरूवात होताच सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विद्याप्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन केलं आणि त्यानंतर त्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पत्रकारांनी मतदारांना काय आवाहन कराल असं विचारलं असता सुनेत्रा पवार म्हणाल्या, "लोकं उत्साहानं बाहेर येत आहेत मी म्हणत नाही पण कर्तव्य म्हणून लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.

Sunetra Pawar
Prajakt Tanpure ED case : प्राजक्त तनपुरेंची ईडी चौकशी थांबवण्याचे आदेश : भाजपच्या जवळ जाताच दिलासा मिळाल्याने वेगळीच चर्चा

दादांनी त्यांच्यासाठी केलेल्या योगदानाची परतफेड आणि श्रद्धांजली म्हणून ते मोठ्या संख्येन बाहेर पडत आहेत. खरं सांगायचं तर पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात होत असल्यामुळे लोकांनीच ती हातात घेतली आहे आणि आपलं कर्तव्य म्हणून ते या निवडणुकीकडे पाहतायत, असं त्या म्हणाल्या.

तर यावेळी पत्रकारांनी, 'दादांच्या पश्यात पहिली निवडणूक आहे आणि साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे ही बारामतीकरांसाठी भावनिक निवडणूक आहे का?' असं विचारताच सुनेत्रा पवार भावूक झाल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या की, "सगळ्याच बाजूंनी अत्यंत भावनिक निवडणूक आहे."

Sunetra Pawar
Satara Politics: आमदार महेश शिंदे म्हणतात, शिवसेनेच्या नव्हे, तर स्वत:च्या ताकदीवर निवडून आलो; मंत्री शंभूराज देसाईंनी ठणकावलं

दरम्यान, यावेळी त्यांनी अजितदादांच्या आईंचं वय 89 असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालं आणि मी येताना त्यांचे आशीर्वाद घेऊनच इथे आल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला दादांशिवाय कोणतीही गोष्ट करण्याची सवय नाही पण आता दादा आपल्यात नाहीत हे मानून चाललं पाहिजे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com