Baramati Crime News : बारामतीत धक्कादायक घटना; तक्रार न ऐकल्याने महावितरण महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, उपचारावेळी मृत्यू!

Baramati Mahavitaran crime News : दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करावा, अशी मागणीही महावितरण आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Baramati Mahavitaran crime News
Baramati Mahavitaran crime NewsSarkarnama

Baramati News : महावितरण कार्यालय आणि सामान्य नागरिक यांच्यात अनेकदा वाद -विवाद होतात. कधी कधी हा वाद इतक्या विकोपाला जातो की, अनेकदा प्रकरण मारहाणीपर्यंत जातात. आता बारामतीतील अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीमध्ये महावितरणच्या कार्यालयात वाद विवादातून एका ग्राहकाने महिला कर्मचाऱ्यावर डोक्यात चक्क कोयता मारल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर सुपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

बारामती येथील मोरगाव या ठिकाणच्या महावितरण कंपनीच्या कार्यालयातील एका महिलेवर जीवघेणा हल्ला घडला. दुचाकीवर येथे आलेल्या एका अज्ञाताकडून महिला कर्मचाऱ्यावर चक्कं कोयत्याने हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या आरोपीने कार्यालयात वीजबिल जास्त येत आहे, अशी तक्रार केल्याची माहिती आहे. मात्र, यावर काहीच दखल न घेतल्याने आरोपी केल्याने अभिजित पोटे याने महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयता टाकला, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, कोयत्याचा जबर वार झाल्याने कर्मचारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baramati Mahavitaran crime News
Pune Crime news : पुण्यातील खळबळजनक घटना; पोलिस कर्मचाऱ्याची चौकीतच गोळ्या झाडून आत्महत्या

या घटनेतमध्ये मृत्यू झालेल्या कर्मचारी महिलेचे नाव रिंकू पिटे असे आहे. या घटनेनंतर जखमी झालेल्या या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार या महिलेला उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले होते. मात्र, पुण्यातच उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. (Crime News)

Baramati Mahavitaran crime News
Pune Crime News : दौंड नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाला रूग्णालयात जाऊन मारहाण...
Baramati Mahavitaran crime News
Beed Crime News : मनोज जरांगेंचे सहकारी, कोपर्डीच्या आरोपींना न्यायालयाच्या आवारात चोप देणाऱ्या अमोल खुनेंवर हल्ला

या प्रकरणात आता बारामती (Baramati) येथील सुपे पोलिस ठाण्यात अभिजित पोटे या आरोपीविरुद्ध 307 कलम अन्वये गुन्हा नोंदवण्यात येणार अशी माहिती होती. मात्र, आता महिलेचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणात 302 अ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करावा, अशी मागणीही महावितरण आणि स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com