Beed Crime News : मनोज जरांगेंचे सहकारी, कोपर्डीच्या आरोपींना न्यायालयाच्या आवारात चोप देणाऱ्या अमोल खुनेंवर हल्ला

Manoj Jarange : गेवराई तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी असलेले अमोल खुने सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर सहकारी व कोपर्डी (जि. अहमदनगर) अत्याचार घटनेतील आरोपींना न्यायालयाच्या आवारातच चोप देणारे अमोल खुने यांच्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी दगडफेक करत हल्ला केल्याची घटना जिल्ह्यात सोमवारी रात्री घडली.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खुने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याची घटना गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाट्यावर घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून हल्ल्याची माहिती मिळताच हजारो समाज बांधवांनी गेवराई रुग्णालयात धाव घेतली.

Crime News
Prithviraj Chavan News : राज्यात मोदींविरोधात वातावरण; अनपेक्षित निकाल लागतील, पृथ्वीराज चव्हाणांचं गणित

गेवराई तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी असलेले अमोल खुने सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला प्रकरणात अमोल खुने यांचा सहभाग होता. मनोज जरांगे यांच्या सुरुवातीपासूनच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात सक्रीय राहिलेले आहेत.

दरम्यान, सोमवारी अमोल खुने गेवराई येथे भाचीला सोडून परत आपल्या धानोरा या गावी दुचाकीवरून जात असताना गढी - माजलगाव महामार्गावरील अर्धमसला फाट्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरु केली. यामध्ये अमोल खुने यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्यांना गंभीर इजा झाली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. त्यांना उपचारासाठी गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेऊन खुने यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोपर्डीच्या आरोपीच्या हल्ल्यातील इतर आरोपींनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची साथ सोडलेली असली तरी अमोल खुने मात्र शेवटपर्यंत मनोज जरांगे यांच्यासोबतच आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Crime News
Lok Sabha Election 2024: निवडणुकीची घोषणा होऊन महिना उलटला तरी 12 जागांचा 'जुगाड' काही केल्या जुळेना !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com