Pune Crime News : दौंड नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाला रूग्णालयात जाऊन मारहाण...

Pune Dound Crime News : या प्रकरणी आता दौंड येथील पोलिस स्थानकात एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातल्या दौंड नगरपालिकेतील एका माजी नगरसेवकाला दुसऱ्या एका पराभूत उमेदवारांकडून रूग्णालयाता जाऊन लाथाबुक्के घालून मारहाण केली गेली. या मारहाणीत संबंधित माजी नगरसेवक हा गंभीर जखमी झाला आहे. प्रभागात सुरु असलेल्या ड्रेनेजच्या कामावर 'लक्ष' ठेवल्यामुळे वाद होऊन, मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आता दौंड येथील पोलिस स्थानकात एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pune Crime News
BJP Vs Congress : काँग्रेस ठाकरे, पवारांसोबत भरकटली; सांगली, भिवंडीवरुन भाजपचा निशाणा

दौंड शहर असणाऱ्या खाटीक गल्ली या ठिकाणी गटार योजनेतील काम सुरू आहे. 8 एप्रिल रोजी दौंड शहरात कार्यरत असणाऱ्या नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडीचा माजी नगरसेवक शहानवाज इब्राहीम खान-पठाण व त्यांचे सहकारी अरीफ लतीफ बागवान हे दोघेही त्या ठिकाणी आले होते. याचवेळी भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभूत झालेला उमेदवार अकबर सय्यद यांच्याशी वादविवाद झाला. तू येथे कशाला आला? असे विचारल्यामुळे यांच्यात हाणामारी झाली. अरिफ बागवान याच्यावर लोखंडी फावडा मारण्यात आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Crime News
NCP Ajit Pawar Group: भाजपला जोर का झटका; भुजबळ नसतील तर अरींगळेंना द्या उमेदवारी!

दरम्यान जखमी अरिफ बागवान याच्याकडून पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात येऊ नये. यात दाखल असलेल्या रुग्णालयात जाऊन दमदाटी करत होते. अकबर सय्यद त्याच्या सहकाऱ्यांनी लोखंडी पाइपने मारहाण करीत शहानवाज याला लाथाबुक्क्यांनी तुडविले. दुखापत करून शिवागीळ करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Pune Crime News
Pune Crime news : पुण्यातील खळबळजनक घटना; पोलिस कर्मचाऱ्याची चौकीतच गोळ्या झाडून आत्महत्या

दौंड पोलिसांनी (Police) शहानवाज खान याच्या फिर्यादीनुसार अकबर सय्यद, अजहर अकबर सय्यद, मोईनुद्दीन फरीद शेख उर्फ मोन्या, निसार खान, तलहा हबीब सय्यद, जुबेर अकबर सय्यद व अरबाज अकबर सय्यद (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड ) यांच्याविरूध्द बेकायदेशीर जमाव करणे, दंगा करणे, घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोचविणे, शांतताभंग करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com