Ajit Pawar War Room : पुण्यातील बारामती हॉस्टेल बनले राष्ट्रवादीची ‘वॉर रूम’; अजितदादांनी फिरवली 3 महापालिकांची सुत्रे

Baramati Hostel Becomes Ajit Pawar’s War Room : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती होस्टेल दादांचे वॉर रूम बनले असून अजित पवारांनी सलग मॅरेथॉन बैठकांचे सत्र घेतले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुण्यातील बारामती होस्टेल चर्चेत आल आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणाहून सर्व महापालिका निवडणुकीची सूत्र हलवण्यास सुरवात केली आहे. गेले दोन दिवस या ठिकाणी अजित पवार मॅरेथॉन बैठका घेत असून विविध घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल नियोजित पुणे दौरा होता. पुणे महानगरपालिकेच्या 3000 कोटींच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते.

Ajit Pawar
G Ram G : खुशखबर! आता 100 नाही तर 125 दिवस मिळणार हक्काचे काम; मोदींच्या नव्या योजनेचा तुम्हाला कसा होणार फायदा?

या नियोजित दौऱ्यात अजित पवारांचा दुसरा कार्यक्रम हा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीं होता. या भेटीसाठी अजित पवार हे सर्किट हाऊस या ठिकाणी जाणार होते. मात्र महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला सुरू होण्यास उशीर झाला आणि कार्यक्रम सुरू असताना राज्यात आचारसंहिता लागू झाली.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर अजित पवारांनी शासकीय विश्रामगृहात जाणं टाळले आणि गणेश कला क्रीडा इथून अजित पवारांची गाडी निघाली मात्र ती सर्किट हाऊस कडे न जाता वळाली थेट सेनापती बापट रस्त्यावरील बारामती होस्टेल या ठिकाणी.

साधारणपणे पाचच्या दरम्यान अजित पवार हे बारामती होस्टेल या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर अजित पवार यांना सांगलीतील काही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी भेटण्यास आले. या भेटायला आलेल्या नगरसेवकांनी थेट अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला त्यावेळेस पुण्यातील काही पदाधिकारी सुद्धा अजित पवार यांना भेटण्यासाठी थांबलेले होते. यामध्ये पुणे शहराचे दोन्ही शहराध्यक्ष अजित पवारांच्या भेटीची वाट पाहत होते.

अजित पवार हे इतर पदाधिकाऱ्यांच्या भेटीत व्यस्त असल्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादीचे पश्चिम भागाचे शहर अध्यक्ष सुभाष जगताप हे भेट न घेताच परतले तर शहराध्यक्ष सुनील टिंगरे हे पूर्ण बैठक होईपर्यंत या ठिकाणी थांबलेले होते.

Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule : युतीचं गणित सुटलं? कुठे मैत्री अन् कुठे 'फाईट'; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं!

अजित पवारांची कालची बैठक यासाठी महत्त्वाची होती की ही बैठक होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही हे जाहीर करून टाकले होते. आणि ही युती होणार नाही असं समजल्यानंतर अजित पवारांनी पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी जुळवा जुळव करण्यास सुरुवात केली.

अजित पवारांनी थेट फोन फिरवले ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांना बैठकीचा आमंत्रणही दिल. मात्र त्या नेत्यांनी या बैठकीस येण्यास नकार दर्शवला कारण दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अधिकृत आणखी कोणताही निर्णय न झाल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी अजित पवारांच्या बैठकीस येण्यास नापसंती दर्शविली असल्याचं बोले जात आहे.

Ajit Pawar
G RAM G: महात्मा गांधी नाही, आता 'जी राम जी'! मोदी सरकारच्या नव्या योजनेची Inside Story!

त्यानंतर आपल्या पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन अजित पवार यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास बारामती होस्टेल सोडलं आणि आपला जिजाई बंगला गाठला. सकाळी पुन्हा साडेसात वाजता अजित पवार बारामती होस्टेलला दाखल झाले. आणि सुरू झाली अजित पवारांच्या पक्षांमध्ये इन्कमिंगची मोठी रेलचेल सकाळीच पिंपरी चिंचवडची बैठक सुरू झाली.

भाजपमधील काही माजी नगरसेवकांनी सकाळी सकाळी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. यामध्ये सुनंदा काशीद आणि त्यांचं परिवार, रूपाली आल्हाट यांसारख्या माजी नगरसेविकांचा समावेश होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये तरी अजित पवारांनी आपण फक्त बोलत नाही तर पिंपरी चिंचवडचे खरे दादा आपणच आहोत हे दाखवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule : युतीचं गणित सुटलं? कुठे मैत्री अन् कुठे 'फाईट'; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी दुपारपर्यंत बैठका होणार आहेत. त्यानंतर या मॅरेथॉन बैठकांचे सत्र पुण्यातील 41 प्रभागातील बैठकानंतर आज संध्याकाळी साधारणपणे सात ते आठ च्या दरम्यान संपणार आहे. यामध्ये पुण्यातील काही प्रवेश अपेक्षित आहेत. त्यामुळे आज दिवसभर अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार बैठका घेताना दिसत आहेत. काल शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवारांसोबत बैठकीला येण्यास नकार दिला असला तरी आज हे नेते अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com