Pune NCP News : अजितदादांचा भाजपमध्ये 'वट' नाही राहिला; जवळच्याच कोणी केला हल्लाबोल?

Shirur Lok Sabha Constituency : शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही काका - पुतण्यात लढाई, कोण बाजी मारणार?
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याचे चॅलेंज अजित पवारांनी अगोदरच दिले आहे. त्यावर कोल्हेंना निवडून आणणार असल्याचे उत्तर रोहित पवार यांनी बुधवारी (ता. 21) पिंपरीत दिले. यावरून शिरूरमध्ये शरद पवार आणि अजित पवार या काका - पुतण्यात अगोदरच सुरू झालेली लढाई आता अजित पवार आणि रोहित पवार या काका -पुतण्यातही रंगल्याचे पाहायला मिळाले आहे.

अजित पवार भाजपमध्ये आता तेवढा वट राहिला नसल्यानेच त्यांना फक्त लोकसभेच्या चार जागा मिळणार आहेत. त्यात शिरूर नसेल, कारण भाजप आणि शिवसेना त्यासाठी आग्रही असून ते अजितदादांचे ऐकणार नाहीत, असा दावा रोहित पवार यांनी पिंपरीत पक्ष कार्यालयात केला. शिवसेनेची ही जागा जर अजित पवारांकडे गेली तर उमेदवार त्यांच्याच कुटुंबातील असेल, असे ते म्हणाले. त्यांचा रोख अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या दिशेने होता. कोल्हेंना पाडणार हा अहंकार बरा नव्हे, असा टोलाही त्यांनी काका अजित पवारांना या वेळी लगावला. त्यासाठी मी पुन्हा येईन असे म्हणणाऱ्यांचे काय झाले याचा दाखला त्यांनी दिला.

Ajit Pawar
Nanded Politics : नांदेडमध्ये काँग्रेसचे 'ते' चार प्रबळ उमेदवार कोण? चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपमध्ये किंमत राहणार नाही. ती ठेवली जाणार नाही, असा दावा रोहित पवार यांनी या वेळी केला. बारामती लोकसभेतील लढाई ही सुप्रियाताई आणि अजितदादा अशीच होईल, असे ते म्हणाले. लोकसभेनंतर शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला विधानसभेला भाजपच्या चिन्हावर लढण्याची पाळी येईल, असे भाकीत त्यांनी केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांना आमच्या पक्षाच्या पिंपरी - चिंचवड अध्यक्षांचा बाप काढावा लागला. त्यातून शरद पवारांची ताकद दिसली, असे ते म्हणाले. अजितदादांसोबत गेलेला पिंपरी - चिंचवडमधील पक्षही मलिदा गॅंग असल्याची संभावना त्यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून रोहित पवार यांनी गृहखाते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. त्यांना याचं काही देणंघेणं नसून ते फक्त राजकारण करीत आहेत. एकनाथ शिंदे आणि अजितदादांची ताकद कमी करण्यात आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येण्यात ते गुंतले आहेत. त्यामुळे त्यांनी गृहखातं सोडावे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षण टिकविण्याचा प्रयत्न करू, असे सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यांनी समाचार घेतला. प्रयत्न करू हा शब्द राजकारण्याच्या तोंडी भीतिदायक आहे, असे ते म्हणाले.

(Edited by Amol Sutar)

R

Ajit Pawar
MVA Meeting : 'मविआ'ची उद्याची बैठक रद्द; 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपाचा फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com