Baramati Lok Sabha Exit Poll: बारामतीत सुप्रिया सुळेंचीच बाजी?

Baramati Lok Sabha Election 2024 Exit Poll Sunetra Pawar Vs Supriya Sule: बारामती लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
Supriya Sule Vs Sunetra Pawar
Supriya Sule Vs Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विजयी होणार असल्याचा अंदाज टीव्ही-9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली.

एकाच कुटुंबात झालेल्या या लढतीमुळे केवळ राज्याचेच नाही, तर पूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघावर आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरतो का हे पाहण्यासाठी 4 जूनची वाट पहावी लागणार आहे.

मात्र, त्याआधीच्या अंदाजामुळे अजित पवार गटाची धाकधूक वाढली आहे. राज्यातील अनेक प्रतिष्ठीत लढतीमध्ये बारामती मतदारसंघाचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे या मतदारसंघात शरद पवारांबाबत (Sharad Pawar) सहानुभूतीची लाट होती. तर अजित पवारांनी विकास कामाच्या जोरावर या मतदारसंघात जोरदार लढत दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' म्हणत महाविका आघाडीच्या उमेदवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला तर आपल्या नेहमीच्या स्टाईलने अजितदादांनी मतदारांजवळ जाऊन केलेल्या कामाचा पाढा वाजून विकासासाठी मतदान करा, भावनिक होऊ नका असं आवाहन केलं. त्यामुळे या मतदारसंघातील जनता नेमकी कोणाला साथ देणार हे सांगण कठीण झालं होतं.

Supriya Sule Vs Sunetra Pawar
Ajit Pawars NCP Exit Poll: अजितदादांचं बंड महाराष्ट्राला रुचलं नाही? 'एक्झिट पोल'मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा...

अशातच आता समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे बारामती शरद पवारांचीच राहणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे ही आकडेवारी शरद पवारांना दिलासा देणारी तर अजित पवारांना धक्का देणारी आहे. दरम्यान, आजच्या एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे फायनल निकाल नाही. त्यामुळे बारामती कोणाची हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com