Ajit Pawar News: शिवतारेंना कोणाचा फोन? दादा म्हणतात, "मला मूर्ख समजू नका..."

Baramati Lok Sabha Election 2024: अजित पवारांनी बारामती दौऱ्यादरम्यान काही गौप्यस्फोट केले होते. यावेळी विजय शिवतारे यांना उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी रात्री बारा वाजता एका ज्येष्ठ नेत्याचा फोन आल्याचा खुलासादेखील त्यांनी केला होता.
Vijay Shivtare, Ajit Pawar
Vijay Shivtare, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawr) यांनी मंगळवारी बारामती दौऱ्यादरम्यान एका मेळाव्याला संबोधित करताना काही गौप्यस्फोट केले. यावेळी विजय शिवतारे यांना उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी रात्री बारा वाजता एका ज्येष्ठ नेत्याचा फोन आल्याचा खुलासा अजित पवारांनी केला होता. आज त्यांना हा ज्येष्ठ नेता नेमका कोण? असा प्रश्न विचारला असता, "मला मूर्ख समजू नका, मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललो" अशी प्रतिक्रिया दादांनी दिली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार (Ajit Pawar) आज पुण्यात (Pune) आले होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण आज महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी फुले वाड्यामध्ये आलो असल्याचं पवार म्हणाले. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांना सासवडमधील (Saswad) सभेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या समवेत जेव्हा बैठक झाली त्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा तसेच एमआयडीसीच्या संदर्भातील विषयांबाबत त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले की, महायुतीच्या बरोबर आहे. परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले पाहिजेत, ते काही पुरंदर विधानसभा आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ भोर मधला काही भागातले प्रश्न आहेत. त्यामुळे हे विषय सोडविण्याच्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली. त्याचवेळी शिवतारेंनी सांगितलेलं होतं की, ते एक दिवस सभा आयोजित करतील आणि त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येतील असं आम्ही आश्वासन दिलं होतं.

तर बारामतीमध्ये (Baramati) मंगळवारी झालेल्या एका मेळाव्यादरम्यान अजित पवारांनी एक गौप्यस्फोट केला होता. यावेळी त्यांनी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना उमेदवारी मागे न घेण्याबाबत एका ज्येष्ठ नेत्याचा रात्री बारा वाजता फोन आल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. हा ज्येष्ठ नेता नेमका कोण होता? याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "तुम्ही मला मी मूर्ख समजू नका? आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे, त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललो आहे आणि तेवढच मी बोलेन.मला सांगायचं ते सांगितलं आहे." असं म्हणत दादांनी अधिकचं बोलणं टाळलं.

Vijay Shivtare, Ajit Pawar
Sachin Ahir : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळेच रवींद्र धंगेकरांचा प्रचार थांबवला?

युतीमधील जागा वाटपावर बोलताना अजित पवार म्हणाले, "सातारा आणि नाशिक सगळं होईल आपण काळजी करू नका. कारण पुढच्या टप्प्यात फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही. नाशिक किंवा कोकण यांच्यातले फॉर्म शेवटच्या टप्प्यात भरायचे आहेत. आज मी मुख्यमंत्र्यांबरोबरच परत जाणार आहे. त्यावेळेस जागा वाटपाबद्दलची चर्चा करून योग्य तो मार्ग काढू."

Vijay Shivtare, Ajit Pawar
Rupali Chakankar News :'दादा रुपालीताईंना आवरा..' काँग्रेसच्या महिला नेत्याने सुनावलं ..!

एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत याबाबत बोलताना अजित पवार म्हणले, "खडसेंनी घरवापसी केली आहे, भाजप वाढवणाऱ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाज, नितीन गडकरी आणि एकनाथराव खडसे यांचे नाव घेता येईल. खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप पोहोचवण्याचं काम खडसे यांनी केलं. मी राजकारणात आल्यापासून तिथे खडसेंचे प्रभुत्व होतं. भाजपासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. ते काही काळ राष्ट्रवादीमध्ये आले होते, मात्र आता ते पुन्हा भाजप प्रवेश करत आहेत."

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com