Ravindra Dhangekar News : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाने ShivsenaUBT काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार थांबवला असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. प्रचार थांबवण्याबाबतच्या सूचना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी दिल्या असल्याचं बोललं जात होत. मावळमध्ये महाविकास आघाडी Mahavikas Aghadi आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे Sanjog Waghmare यांचे काम काँग्रेस करत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात होते. यावर आता सचिन अहिर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले, रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar हे आता जरी काँग्रेसवासी झाले असले तरी ते मूळचे शिवसैनिक असून ते पूर्वी शिवसेनेतच होते. कसबा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने Shivsena मोठ्या प्रमाणात ताकद लावल्याने ते निवडणूक जिंकले आहेत आणि हे त्यांनी देखील मान्य केले आहे.
रवींद्र धंगेकर यांच्याबाबत वैयक्तिक असा द्वेष नाही. त्यांना गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला Congress शिवसेनेची मोठी ताकद मिळत आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये सांगली तसेच इतर जागेचा तिढा सुटत नसल्याने काही काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला वरिष्ठांनी अद्याप काम करण्याच्या सूचना दिल्या नसल्याचे सांगत होते. असाच प्रकार मावळमध्ये देखील होत होता. Current News About Pune Politics
मात्र आता काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली. त्यामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे. रवींद्र धंगेकर यांच्या आतापर्यंतच्या झालेल्या सर्व बैठकांना शिवसेनेचे पदाधिकारी जातीने उपस्थित राहिले आहेत. आजच्या बैठकीला देखील शिवसेनेचे दोन्ही शहर प्रमुख उपस्थित राहतील. याबाबत शहर प्रमुखांशी संपर्क झाला असून स्थानिक पातळीवर कोणते मतभेद आहेत का याबाबत विचारणा केली आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे शहर प्रमुखांनी देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पूर्ण ताकदीनिशी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याचं सचिन अहिर म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वरिष्ठ नेत्यांचे दौरे पुणे जिल्ह्यात होणार असून 23 तारखेला संजोग वाघिरे यांना उमेदवारी अर्ज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भरण्यात येणार आहे. मुळशीमध्ये देखील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मोठी सभा घेण्यात येणार आहे. पुण्यात देखील मागणीनुसार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे सभा घेतील असं सचिन अहिर यांनी सांगितलं.
Edited By : Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.