Rohit Pawar On Ajit Pawar : आईची योग्यता काढणाऱ्या अजितदादांना रोहित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर !

Baramati Lok Sabha Constituency : आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या सुप्रिया सुळे यांच्या बाजुने प्रचार करत आहेत. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी बारामतीमध्ये धनशक्तीचा वापर होणार असल्याचे म्हटलं होतं..
Ajit Pawar- Rohit Pawar
Ajit Pawar- Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभेची निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे, तशी प्रचारातील रंगत अधिकच वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार देखील जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दहा महिने झाले असून या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी लढत या मतदारसंघात पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार कुटूंबातील व्यक्तींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कुटूंबातील बहुतांश व्यक्ती शरद पवार यांच्या बाजुने बोलत असल्याने अजित पवार एवटे पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अजित पवार यांचे धाकटे भाऊ राजेंद्र पवार, पुतणे युगेंद्र पवार हे बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या देखील सुळे यांच्या बाजुने प्रचार करत आहेत. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी बारामतीमध्ये धनशक्तीचा वापर होणार असल्याचे म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar- Rohit Pawar
Supriya Sule Vs Ajit Pawar : तुम्ही 18 वर्षे पालकमंत्री तुमच्याच हातात पुण्याचा कारभार मग...,सुळेंचा अजित पवारांना सवाल !

बुधवारी महाराष्ट्र (MAHARASHTRA) दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रमासाठी पालकमंत्री अजित पवार आले होते. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यावेळी सुनंदा पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत अजितदादांना विचारले असता. मी कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही.आमच्या योग्यतेच्या माणसाने प्रश्न विचारला तर त्याला मी उत्तर देईल, असे भाष्य केले होते. अजित पवारांनी आपली आई बद्दल केलेल्या वक्तव्याचा आमदार रोहित पवारांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. एक्सवर ट्विट करत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आम्ही आजपर्यंत तुमचा प्रचार केला तेव्हा आम्ही योग्यतेचे होतो, आता योग्यतेचे वाटत नाही, असा हल्लाबोल रोहित पवारांनी अजितदादांवर केला आहे. शिवाय बाकी सगळे विरोधात असलेले नेते आता तुमच्या योग्यतेचे आहेत, असा टोला देखील रोहित पवार यांनी त्यांना लगावला आहे. बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील मला विश्वास बसत नाही तो असं बोलू शकतो, मला याबद्दल काही माहीत नाही, मी चेक करून बोलते, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Ajit Pawar- Rohit Pawar
Eknath Shinde News : महायुतीत एकनाथ शिंदेंचं वजन वाढलं; अजितदादांचं काय ?

रोहित पवार यांनी ट्विट मध्ये नक्की काय म्हंटले आहे....

Ajit Pawar- Rohit Pawar
Ramdas Athawale News : 'लोकशाही धोक्यात आली असती, तर मोदी...' ; रामदास आठवलेंचा विरोधकांना सवाल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com