Baramati Lok Sabha : 'गुलाल आपलाच...' सुप्रिया सुळेंसाठी ठाकरे गटाचा उत्साह शिगेला, अभिनंदनाचे बॅनर झळकले

Supriya Sule : कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेली ही बॅनरबाजी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मात्र फारशी पाहायला मिळाली नाही.
 Supriya Sule banner
Supriya Sule bannersarkarnama

Pune Political News : पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर बॅनरबाजीचा वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. मतमोजणी 4 जूनला होणार असताना त्यापूर्वीच उत्साही कार्यकर्ते आपलाच नेता विजयी होणार, या अविर्भावामध्ये बॅनरबाजी करताना दिसत आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून सुरू झालेली ही पोस्टरबाजी नंतर मावळ, शिरूर मध्येही दिसून आली. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघात सामना अटीतटीचा असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी टाळण्याचा दिसून येत होते. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून बारामती लोकसभा Baramati Lok Sabha मतदारसंघात गुलाल आपलाच म्हणत बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 Supriya Sule banner
Narendra Modi News : मोदी अन् शहा यांच्यानंतर भाजपला मते मिळवून देणारं नेतृत्व कोण?

पुणे लोकसभेचे Pune Loksabha मतदान झाल्यानंतर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना खासदार झाल्याबद्दल अभिनंदन करणारे पोस्टर भाजपा कार्यकर्त्याकडून लावण्यात आले होते. हाच कित्ता गिरवत नंतर काँग्रेस Congress कडून देखील अशाच प्रकारची बॅनरबाजी करत पुणे, बारामती, शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकणार असल्याची दावा करण्यात आला. असाच काहीसा प्रकार शिरूर आणि मावळ मध्ये देखील पाहायला मिळाला.

कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेली ही बॅनरबाजी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मात्र फारशी पाहायला मिळाली नाही. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडून आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचं सांगण्यात येत असलं तरी पूर्णपणे आत्मविश्वास हा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत नाहीये. लोकसभा मतदारसंघातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला असून किरकोळ मताधिक्याने कोणीही विजयी होऊ शकते, अशी चर्चा सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार असो वा सुप्रिया सुळे या दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांनी 4 जून पर्यंत वाट पाहूनच नंतर आनंद साजरा करण्याचा ठरवलं असल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र याला अपवाद म्हणून भोरमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मात्र सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन करत गुलाल आपलाच, या शीर्षकाखाली भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे यांनी पुणे बेंगलोर हायवे लगत शिंदेवाडी परिसरामध्ये बॅनर लावल्याचे दिसून येत आहे.

बारामती लोकसभा निवडणुकी दरम्यान भोर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे गटामध्ये असलेले कुलदीप कोंडे यांनी शिंदे गटात प्रवेश करून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. त्यांनी जरी वेगळी भूमिका घेतली असली तरी तालुका अध्यक्षांसह इतर कार्यकर्ते मात्र महाविकास आघाडीचा जोमाने प्रचार करताना पाहायला मिळाले. ठाकरे गटाचा प्रचारातील हाच उत्साह आता मतदानानंतरही दिसून येत असल्याचं बोलले जात आहे.

(Edited By Roshan More)

 Supriya Sule banner
Operation Jhaadu : PM मोदींकडून ‘ऑपरेशन झाडू’ला सुरूवात! दिल्लीत राजकारण तापलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com