Vijay Shivtare News : शिवतारेंनी अजितदादांना दिला शब्द; 'बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असणार'

Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर तालुक्यातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात पुरंदर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर तालुक्यातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात पुरंदर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने सर्वांनी येत्या काळात मतभेद बाजूला ठेऊन महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केले.

पुरंदर तालुक्यात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह तालुक्यातील नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्याला तालुक्यातील जनतेचा मोठा पाठिंबाही मिळाला. यासाठी संपूर्ण पुरंदर एक झाला होता.

Vijay Shivtare
Amit Shah News : 'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी अन् अर्धी काँग्रेस' म्हणत अमित शाहांनी लगावला टोला!

या सर्व घटना घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला त्यावेळी एक अनामिक फोन आला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री शिंदे तुमच्यामुळे तणावात आहेत. तुम्ही अपक्ष उभा राहिलात तर महायुतीमध्ये बंडखोरी होईल. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, त्यामुळे मी नरमाईची भूमिका घेतली. संघर्ष करून मिळणार होते ते तहात मिळाले, याचा आनंद होत असल्याचे शिवतारे म्हणाले.

येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे यांनी रखडलेला गुंजवणीचा प्रकल्प लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात तालुक्यातील सर्व कामे मार्गी लागणार आहेत. त्याशिवाय तीन उपसा सिंचन योजना सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे तालुक्यातील विकास कामासाठी ते निधी कमी पडू देणार नाहीत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे येत्या काळात पुरंदर तालुक्यातील जनतेने नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार असे आश्वासनही यावेळी माजी मंत्री शिवतारे यांनी दिले.

Vijay Shivtare
Vijay Shivtare News : शिवतारेंचा असाही यू टर्न; सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'तुम्ही दिल्लीला जा आम्ही...'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com